Posts

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४

Image
श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त छबिना १३/११/२०२४ निमसोड गावात श्री सिद्धनाथ देवाची मोठी यात्रा भरते. मंदिरासमोर तुळशीविवाह लावला जातो. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित असतात. दिपमाळला तेल घातला जात.तुळशी विवाह दिवशी छबिना निघतो.  श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त छबिना व्हिडिओ श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त श्रींची रथातून मिरवणूक प्रारंभ दुसरा दिवस म्हणजे मुख्य दिवस सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं जय घोषत उत्साहात यात्रा पार पडते. हजारो भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करतात.सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं जय घोषत निमसोड नगरी दुमदुमून जाते. रथावर अक्षरशहा पैशाचा पाऊस पडतो. नाथबाबा चा वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असतो. सकाळी मानकरीयांचे धज दीप माळ ते मंदिराचा कळस असे वाजत गाजत मिरवणूकीत बांधले जातात. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उत्सवाला सुरुवात होते. गावातील ग्रामस्थ मानकरी उपस्थित श्रीफळ वाढवून पूजन केले जाते.  श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त रथयात्रा निमसोड चे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेला हजारो भाविक उपस्थित असतात. गुलाल खोबऱ्याची उधळन होते.

१३ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी मायणी, खटाव जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६६८ छत्रपती शिवरायांकडून गोव्यामध्ये सप्तकोटीश्वर मंदिर बांधण्यास सुरुवात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १३ नोव्हेंबर १६७३ मुंबईकर सूरतकरांना १३ नोव्हेंबर १६७३ ला लिहितात: "सिद्दीने तक्रारी केल्या असताना सुभेदाराचे आमच्याबद्दल इतके मन आहे हे वाचून आनंद झाला. आता बंदरांत असलेल्या बादशहाच्या दोन गलबतांना आम्ही चांगले वागविले हे पाहून बादशाहाविषयी आमचे मनांत पूज्यबुध्दी आहे हे त्याला दिसून येईल ... फ्रेचांनी जर इतक्या तोफा आणि इतके शिसें ( गोळे ) राजापूरला पाठविले असतील, तर शिवाजीला सिद्दाविरुध्द चांगले आरमार सज्ज करणस बरे पडेल. कारण त्याने आमच्याकडे मागणी केली परंतु आमच्याजवळ पुष्कळ तोफा असूनही आम्ही तुमच्या सूरतेतील हितसंबंधाकडे लक्ष देऊन तोफा दिल्या नाहीत." सूरतकरांनी १३ नोव्हेंबर १६७४ ला उत्तर लिहिले जे:'  "शिवाजीच्या तोफांच्या मागणीबद्दल कळविण्यांत आले. त्यावर आमचे मत असे आहे की, अशा कृत्याने बादशहाला घुस्सा येईल.  फ्रेंचानी नुक

१२ नोव्हेंबर १६५९छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी "कराड" प्रांत जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६६७ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सरहद्द पोर्तुगीज प्रदेशाला भिडली होती. त्यावेळचा पोर्तुगीज विजरई कोंदी दि सांव्हिसेंती हा फारच धर्मान्ध होता. त्याने बारदेश मधील चार हजार हिंदूंचे सक्तीने धर्मांतर केले होते. आणि इतर हिंदू लोकांना २ महिन्याच्या आत बारदेश व गोवा सोडून जाण्यास सांगितले. शिवाय पोर्तुगीजांच्या आश्रयाला गेलेले कोकणातील देसाई त्यांच्या मदतीने स्वराज्यातील प्रदेशावर धाडी घालत असत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी बारदेशवर ५ हजार पायदळ व १ हजार घोडदळ घेऊन मोहीम काढली. १० नोव्हेंबर पासून सलग तीन दिवस महाराजांच्या सैन्याने या भागात धुमाकूळ घालत अनेक धर्मान्ध पोर्तुगीजाना ठार केले. या मोहिमेत महाराजांनी पोर्तुगीज व कोकणातील फितूर देसायांना कायमचा धडा शिकवला. महाराजानी या मोहिमेत १३०० कैदी पकडले. शिवाय त्यांना यातून १५० लक्ष होनांची लुटही मिळाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १२ नोव्हेंबर १६८३ किल्ले फोंड्यावर प्रचंड

२ नोव्हेंबर १६७७छत्रपती शिवरायांनी तंजावरची ठाणी जिंकली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ नोव्हेंबर १६७७ छत्रपती शिवरायांनी तंजावरची ठाणी जिंकली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २ नोव्हेंबर १६८९ छत्रपती राजाराम महाराज जिंजीत दाखल हरजीराजे महाडिकांच्या निधनानंतर जिंजीचा सर्व कारभार शिवरायांची कन्या अंबिकाबाई यांच्याकडे आला. राजारामांचे दक्षिणेतील आगमन त्यांच्या अधिकारावर गदा आणणारे ठरले. त्यामुळे त्यांनी आपल्या सावत्रभावाला विरोध करायचा ठरवले. २८ ऑक्टोबर १६८९ रोजी राजाराम वेल्लोरच्या कोटात पोहोचले. तेथून त्यांनी आपल्या सावत्रबहिणीकडे आपला वकील पाठवला व जिंजीचा किल्ला स्वाधीन करण्याविषयी निरोप दिला. परंतु उलट अंबिकाबाईंनी राजारामांविरुद्ध लढण्याचा पावित्रा घेतला. त्या वेल्लोरच्या दिशेने ससैन्य निघाल्या. पण वाटेत त्यांच्या सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली. आपली लंगडी बाजू बघता त्यांनी माघार घेतली. राजाराम महाराजांना दक्षिणेतील विविध मराठी किल्लेदार, ठाणेदार, मुलकी, प्रशासनिक व लष्करी अधिकाऱ्यांनी स्वराज्याचे छत्रपती म्हणून मान्यता देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अंबिकाबाईंचा विरोध पूर्णपणे निष्प्रभ ठरला व त्यांनी जिंजी किल्

१ नोव्हेंबर १६७८छत्रपती शिवरायांनी तंजावरच्या उत्तरेकडील मुलुख जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ नोव्हेंबर १६७६ "छत्रपती संभाजीराजे" हे त्यांच्या पत्नी "महाराणी येसूबाई साहेब" यांच्यासोबत शृंगारपुरात येऊन राहिले.. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ नोव्हेंबर १६७८ छत्रपती शिवरायांनी तंजावरच्या उत्तरेकडील मुलुख जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १ नोव्हेंबर १६७९ मराठ्यांचा खांदेरीला पुरवठा, इंग्रजांचा त्यांचा पाठलाग आणि मराठ्यांनी त्यांना चुकवणे किंबहुना बऱ्याचदा तर इंग्रजांना पिच्छा करायला लावून आपल्या जाळात अडकवणे आणि दूर नेवून एखादा मचवा पकडणे हा मराठ्यांचा व्यवसाय अगदी व्यवस्थित सुरु होता. गनिमी काव्याचा हा सागरावरील केलेला बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा ! .इंग्रज या रोजच्याच उपद्व्यापामुळे जेरीस आले. केग्वीन या त्रासाने वैतागला आणि त्याने १ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश - “नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही म

३१ ऑक्टोबर १६८३छत्रपती संभाजीराजे गोव्यानजीक म्हणजेच "किल्ले फोंडा" सीमेवर दाखल झाले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ ऑक्टोबर १६२४ थोरले महाराज "शहाजीराजे" यांचे बंधू शरीफजीराजे हे भातवडीच्या लढाईदरम्यान धारातिर्थी पडले. इतिहासामध्ये ‘भातवडीचं युद्ध’ म्हणून एक लढाई प्रसिद्ध आहे. ३१ ऑक्टोबर १६२४ रोजी ही लढाई लढली गेल्याची नोंद आहे. अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही मुळापासून नष्ट करण्यासाठी भारतभरातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. पण ते तितकेसे सोपे नव्हते, कारण निजामशाहीकडे शहाजी राजे आणि शरीफजी राजे हे भोसले घराण्यातील २ पराक्रमी योद्धे होते. तलवारी भिडल्या आणि निजामशाही वाचवण्यासाठी शहाजीराजे आणि शरीफजीराजे निजामाचा वजीर मलिक अंबरच्या साथीने भल्या मोठ्या शत्रू पक्षांच्या सेनेला कापत सुटले. अशक्य वाटणाऱ्या या युद्धात शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला, पण त्यांना आपले बंधू शरीफजी राजे यांना मात्र गमवावे लागले. जर शरीफजी राजे जास्त काळ जगले असते, तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये अजून काही पराक्रमी गाथांची नोंद नक्की झाली असती !  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३१ ऑक्टोबर १६७९ छत्रपती संभाजी राजे व दिलेरखान यांची विजापूरला मोर्चे बांधणी

३० ऑक्टोबर १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवरायांनी "तिरुवनमलाई" येथील अरुणाचलेश्वर शिवमंदिराचा जिर्णोद्धार करून तिथे दीपोत्सव केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० ऑक्टोबर १६७७ "दक्षिण दिग्विजय मोहीम" छत्रपती शिवरायांनी "तिरुवनमलाई" येथील अरुणाचलेश्वर शिवमंदिराचा जिर्णोद्धार करून तिथे दीपोत्सव केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० आॅक्टोबर १६८४ किल्ले रायगडच्या फितुरीचा कट करण्याच्या कारणास्तव छत्रपती संभाजीराजे यांनी "पंत राहुजी सोमनाथ", "गंगाधर पंत", "मानाजी मोरे", "वासुदेव पंत" यांना कैद करण्याचे आदेश दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० ऑक्टोबर १९२८ लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.  त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड, सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र. "जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩