Posts

१७ मे १७१५मराठ्यांनी निरनिराळ्या युद्धात वापरलेले घोडदळइ.स. १७१५ मध्ये कान्होजी भोसले या मराठा सरदाराने चंद्रपूरच्या युद्धात वापरलेल्या घोडदळाचा उल्लेख मिळतो तो याप्रमाणे, "१७ मे, १७१५ रोजी, जयपूरचा राजा जयसिंगाने पिलसूदच्या लढाईमध्ये कान्होजी भोसल्यांचा पराभव केला. त्यामुळे कान्होजींनी आपला उत्तरेतील मार्ग आडलेला पाहून चंद्रपूर प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून सहा हजार घोडेस्वारांनिशी चंद्रपूरवर आक्रमण केले. चंद्रपूरचा पराभव करून अर्धे राज्य हस्तगत केले. छत्रपती शाहू महाराजांना एक हत्ती नजराणा म्हणून पाठवून कान्होजी उत्तरेकडे वळले."

🚩 आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष 🚩 🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 १७ मे १६६६ शब्दांनी उधळून लावलेले औरंगजेबाचे कारस्थान शिवाजीराजांना घेऊन काबूलच्या स्वारीवर जाण्याची तयारी रामसिंह करीत होता. बादशाहाचा लाडका क्रूर सरदार शुजाअतखान हा आपल्याबरोबर येणार आहे याचा धसका रामसिंहाला होताच. कूच करण्यास अजून पाच-सात दिवस लागणार होते. महाराज स्वत: या औरंगजेबी डावामुळे अस्वस्थ होते. त्यांनी एक वेगळेच रान यावेळी उठविले. कोणते ? महाराजांकडे रोज दिवसातून अनेकदा शाही सरदारमंडळी भेटावयास यायची. आजपर्यंत (दि. १७ मे १६६६ ) महाराज या सरदारांशी छान हसून, गोडीने बोलायचे. पण काबूलच्या वातेर्ने चिडलेले महाराज, काबूलचा विषय न काढता या येणाऱ्या सरदारांशी औरंगजेबाबद्दल सरळसरळ टीकात्मक बोलावयास लागले. त्यात चीड होती. राजांचा आशय असा होता, ‘ बादशाहांच्या वतीने केवढी वचने दिली. पण इथे आल्यापासून तुमचे बादशाह आमचा सतत अपमानच करीत आहेत. आम्हाला दिलेल्या वचनांचं काय ? हाच शाही रितरिवाज आहे काय ? शब्दांची किंमत नाही ? आम्ही उघडउघड फसलो आहोत. हे बादशाही प्रतिष्ठेला शोभतं का ?’ भेटीस येणाऱ्या सरदारमंडळींशी हे असंच रोज अन् सतत म

१५ मे १६७७छत्रपती शिवाजी महाराज पोपोलमवरुन जिंजीकडे रवाना.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 १५ मे १६६६ रामसिंगाने जामीनाबाबत छत्रपती शिवाजीराजांना सांगितले. १५ मे रोजी सकाळीच शिवाजीमहाराज शुचिर्भूत होऊन रामसिंगाच्या डेऱ्यात आले आणि महादेवाची पूजा करून त्यांनी त्यावरील बेल-तुळशी हातात घेऊन रामसिंगाला वचन दिले की, 'मी आग्रा सोडून जाणार नाही किंवा काही बिघाडही करणार नाही!' त्याप्रमाणे रामसिंगाने त्याच्या लेखनिकास जामीनपत्र लिहिण्यास सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळच्या दरबारात हे जामीनपत्र घेऊन रामसिंग गेला. घुसलखान्यात त्याने ते मीरबक्षी अमीनखानाच्या स्वाधीन केले. अमीनखानाने ते औरंगजेब बादशहाला सुपूर्द केले. यामुळे आता शिवाजीमहाराज रामसिंगाच्या नैतिक बंधनात अडकले. जोपर्यंत हा जामीन कायम होता तोपर्यंत काही शिवाजीराजे आग्र्यातुन सुटणार नव्हते. औरंगजेबाने धुर्तपणे ही खेळी केली. शस्त्र न चालवता, शह काटशह, डाव प्रतिडाव खेळण्यास दोन्ही बाजुंनी सुरुवात झाली होती. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 १५ मे १६७७ छत्रपती शिवाजी महाराज पोपोलमवरुन जिंजीकडे रवाना. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 १५ मे १७३१ छत्रपती शाहूराजे (

छत्रपती संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.१६५७छत्रपती संभाजी महाराज यांची ३६६ वी जयंती.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 १४ मे १६५७ छत्रपती संभाजी महाराज यांची ३६६ वी जयंती 🚩 छत्रपती संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.... सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शिवशुभेच्छा...🚩🚩 जय शंभूराजे....🚩🚩🚩🚩🚩 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 १४ मे १६६६ आग्र्याच्या भेटीनंतर महाराजांना कैद करण्यात आले. त्यांना राहअंदाजखानाच्या वाड्यात नेण्यात यावे, अशी आज्ञा बादशहाने शिद्दी फौलादला केली. राहअंदाजखान हा आग्र्याचा किल्लेदार होता. १४ मे रोजी त्याच्या हवेलीत महाराजांची हत्या करण्यात येणार होती. परंतु रामसिंग त्यांना जामीन राहिला आणि महाराज बचावले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 १४ मे १६७७ ९ मे १६७७ ते १४ मे १६७७ दरम

*१३ मे इ.स.१६७०*मराठ्यांनी मावळ प्रांतातील "लोहगड" व "विसापुर" हे किल्ले एकाच दिवशी जिंकले.

*आजचे ऐतिहासिक शिवदिनविषेश* *१३ मे इ.स.१६५९* छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभू देशपांडे यांना "हिरडस मावळ" मधील किल्ले मोहनगडची दुरुस्ती करण्याचे काम दिले. *१३ मे इ.स.१६६६* (वैशाख वद्य पंचमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार रविवार) रामसिंह महाराज व युवराज शंभुराजेंच्या डेऱ्यात!      कुंवर रामसिंहाकडे औरंगजेब बादशहाने महाराजांच्या तब्बेतिची विचारपूस केली. महाराजांचा राग निवळावा म्हणून सायंकाळी दरबारात युवराज शंभुराजेंना बोलावून त्यांना भरजरी वस्त्रे, मोत्याची माळ व रत्नजडित कट्यार देऊन सत्कार केला. एक विचित्र नियतीची भेट होत होती. *१३ मे इ.स.१६७०* मराठ्यांनी मावळ प्रांतातील "लोहगड" व "विसापुर" हे किल्ले एकाच दिवशी जिंकले. *१३ मे इ.स.१६७१* महाराजांचे एक पत्र : "चिपळूणी सैन्याचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुभ्यास पावसाळाकारणे पागेस सामा, दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होउन गेला. त्याकरिता कारकुनाकडुन व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास वातेल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंद करुन चाराल नाहीसे झाले म

१० मे १६३५थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 १० मे १६२६ मलिकअंबर याचा मृत्यू मलिक अंबर हा निजामशाहीचा वजीर होता. हाही मूळचा गुलाम. बगदादच्या एका व्यापाऱ्याच्या गुलामीत तो होता. त्या व्यापाऱ्याने याला निजामशाहीचा वजीर चंगीजखान याला विकले. पुढे आपल्या कर्तृत्त्वाने तो त्याच निजामशाहीचा वजीर बनला. लखूजी जाधवराव, मालोजी व शहाजी भोसले, बाबाजी काटे असे अनेक सरदार त्याच्या हाताखाली पराक्रम करीत असत. हा मोठा कर्तबगार मुत्सद्दी होता. औरंगाबाद हे शहर त्याने वसविले. त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे त्याची "मलिकंबरीतह' या नावाने ओळखली जाणारी वसुलीपद्धत. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 १० मे १६३५ थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचं वार्षिक उत्पन्न त्याकाळी २० लाख ७५ हजार होन असल्याचं विजापूरच्या आदीलशहाचं अधिकृत पत्र. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 १० मे १७८५ शिखांचा बंदोबस्त-श्रीमंत महादजी शिंदे इ.स.१७८५ च्या जानेवारी महिन्यात अंबुजी इंगळे यांना दिल्ली आणि उत्तरेकडील प्रातांच्या बंदोबस्ताकरिता महादजींनी रवाना केले,शिखांचा दिल्ली प्रातांत नेहमी उपद्रव होत असे . शि

७ मे १६६०पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ७ मे १६६० पुण्याकडे निघालेल्या शाहीस्तेखानाच्या फौजेवर मराठ्यांनी अचानक गनिमी काव्याने हल्ला चढवला आणि त्यांची रसद लुटून नेली. यानंतर ४ दिवस खानाचं सैन्य उपाशी होतं. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ७ मे १६७४  छत्रपती शिवराय रायगडावर मुक्कामी. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻       ७ मे १६८० राज्यभिषेकापुर्वी म्हणजेच इ.स. १६८० 'वैशाख वद्य ४ शके १६०२' च्या  मुरगुडच्या 'रुद्राप्पा देसाईला' पाठवलेल्या अभयपत्रावर ही "शोडशावली" राजमुद्रा प्रथम अाढळली. 'भोसले' घराण्यातील हि "छत्रपती शंभुराजांची राजमुद्रा" छत्रपती "शिवरायांच्या" मुद्रेपेक्षा आकाराने वेगळी असुन उभी 'पिंपळपानी' ७ ओळींची हि "राजमुद्रा" स्वतःची 'अस्मिता' व 'रुबाब' व्यक्त करते. राजमुद्रे प्रमाणे त्यांची 'मर्यादा' सुध्दा "शिवाजीराजेंच्या" मर्यादेपेक्षा एका अक्षराने वेगळी आहे. बहुजन विकासाची आस आणि सार्वत्रिक मुरगुडच्या रूद्राप्पा देसाई यास छत्रपती शिवरायांच्या काळात

६ मे १६७५छत्रपती शिवाजी महाराजांनी "फोंडा किल्ला" जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ६ मे १६३६ शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे तह झाला इ.स. १६३६ मध्ये बादशहा शाहजहान याने दक्षिण काबीज करण्याच्या हेतूने निजामशाहीवर स्वारी केली आणि राज्य जिंकून घेतले परंतु मोगलांच्या राजधानीपासून दूर असलेला हा प्रांत ताब्यात ठेवणे अवघड असल्याने ६ मे १६३६ या दिवशी त्याने आदिलशहाबरोबर तह केला. त्यात असे ठरले की,' मामले रायगड व निजामशाही कोकण विजापूरच्या आदिशाहास द्यावेत त्याबद्दल आदिलशाहाने वीस लक्ष होन किंवा ऐंशी लक्ष रुपये शहाजहानला द्यावेत. या तहामुळे आदिलशाही सत्ता रायगड आणि निजामशाही कोकणावर प्रस्थापित झाली. हा "तह" दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा होता व यामध्ये २ "कलम" होते. एका कलमाप्रमाणे 'अदिलशहा हा 'शहाजहानचा' मांडलीक झाला. दुसर्‍या कलमाप्रमाणे 'निजामशाही' संपवून ते राज्य 'मुघल' व 'अदिलशहा' यांनी वाटून घेण्याचे ठरले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 ६ मे १६५६ रायरी हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले. रायरीहा किल्ला