Posts

Showing posts with the label औंधाचा राजा....!!

औंधाचा राजा....!!

Image
औंधाचा राजा....!!          शाळेत असताना माडगूळकरांचा धडा होता.त्यात शाळा तपासणी ला आलेला राजा गदिमांना "बाळ तू टाकीत जा" म्हणजे बोलक्या सिनेमात जा...!!असं म्हणतो आणि पुढं मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडला..!! पंतप्रतिनिधींच्या संकल्पनेंवर चित्रपट निघाले..!!त्यांच्या सुर्यनमस्काराच्या प्रेमावर आचार्य अत्रेंनी नाटक काढलं.आपल्या छोट्याशा संस्थानात शिक्षण,उद्योग पंतप्रतिनिधीनीं फुलवलं.       राजा रयतेचा विश्वस्त असतो . स्वातंत्र्यापूर्वीच राजाने आपल्या रयतेला स्वराज्य दिलं.राज्याची घटना म.गांधींकडून लिहून आणली.       महाराष्ट्र सृजनात्मक आणि रचनात्मक असल्याचं कारण त्याच्या कर्तुत्ववान पुरूषांच्या कारकिर्दीत आहे. स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. आई राजा..उदं..उदं.