शस्त्रचित्रं'
🛑 शस्त्रचित्रं' भारतीय मूर्तीशास्त्रामध्ये विविध देवी-देवता, अन्य पौराणिक संकल्पना यांसाठीची ‘शिल्पलक्षणे’ सांगितलेली आहेत. म्हणजेच, एखादी विशिष्ट मूर्ती घडवताना ती कशाप्रकारे बनवावी? याचे ‘criteria’ सांगितलेले आहेत. त्यामुळे परंपरागत लक्षणशास्त्रानुसार अशा मूर्ती आपल्याला सहज ओळखता येतात. ज्याप्रमाणे या मूर्त्यांची एक परंपरागत ‘symbology’ तयार झालेली आहेत, अगदी तशीच symbology परंपरागत घडण, वापर, धारणा यांमधून भारतीय शस्त्रांचीही तयार झालेली आहे. उदाहरणार्थ, ‘तलवार’ म्हटल्यावर लांब-वक्र पाते, एक मूठ, ‘कट्यार’ म्हटल्यावर त्रिकोणी दुधारी पाते, उभट पकड याच रचना नजरेसमोर येतात. शतकानुशतकांच्या मौखिक, लिखित आणि उपायोजित (applied, प्रत्यक्ष वापरातून) स्रोतांमधून शस्त्रांच्या रचनांचे, आकारांचे हे निकष दृढ होत आलेले आहेत. अमुक एका शस्त्राला ‘तलवारच’ का म्हणतात? किंवा हे शस्त्र ‘तलवार’च कशामुळे आहे? अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी प्राचीन, मध्ययुगीन लिखित संदर्भांमधील शस्त्रवर्णने, शस्त्रांची विविध प्रांतांमध्ये असलेली मौखिक ओळख (पारंपरिक युद्धकला, शस्त्र बनविणारे कारागीर यांच्याक