चंद्रसेन देवांची यात्रा किल्ले वसंतगड -तळबीड 2021
कुलदैवत चंद्रसेन महाराज:- किल्ले वसंतगडावर वरती जाण्याचे दोन मार्ग आहे. वसंतगड गावातून आणि दुसरा सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड गावातून. गडावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अंदाजे अर्धा तास चालून सर्वसामान्य माणूस किल्ल्यावर पोचतो. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन मंदिर प्राचीन व बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असून. शेकडो वर्षापासून मंदिर प्राचीन बांधकामाचा उत्तम नमुना आहे. मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. अनेक गावात चंद्रसेन देवाची यात्र भरावली जाते. वरील फोटो मध्ये मुख्य गाभारा मध्ये असणारे प्राचीन मूर्ती आहेत. डाव्या बाजूने चंद्रसेना ची बहिण जानाई देवी असून. मध्य मुख्य भागी पाषणातील मूर्ती श्री चंद्रसेन महाराजांच्या असून. डाव्या बाजूस जोगेश्वरी देवींची मूर्ती आहे. 👉 चंद्रसेन जोगेश्वरी विवाह:- अनादी काळापासून किल्ले वसंतगडवर असणाऱ्या चंद्रसेनदेव जोगेश्वरी देवींची यात्रेच्या दिवशी. हळदीचा कार्यक्रम. लग्नाचा विधी असतो. प्रमुख मानकर, पुजारी भक्त, सेवेकरी यांच्या हस्ते.