छत्रपती संभाजी महाराजाचा आज11मार्च छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन...!!!
👉 बालपण :- महापराक्रमी, कर्तृत्वान माणसांच्या बाबतीत तुकाराम महाराज एका अभंगात असं म्हणतात. न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पतिमेळ हाकारूनी अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी धरिता ही परी आवरे ना.... किल्ले पुरंदराचे भाग्य उजळले १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदराचे जणू भाग्य उजळले आणि त्याच्या साक्षीने स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा ‘संभाजी’ नामक महापराक्रमी, जगातला सर्वोत्तम पुत्र,जन्माला आला. शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. चंद्रकोरीप्रमाणे लहानग्या संभाजी राजांच्या लीला वाढत होत्या. पण आपल्या पुत्राची वैभवशाली कारकीर्द कर्तबगार महाराणी सईबाईंना पाहता आली नाही. पुण्याजवळील कापूर होळ येथील धाराऊ गाडे पाटील यांनी संभाजी महाराजांना लहानपणी स्वतःचं दूध आई होऊन पालन केले . शिवाय राजमाता जिजाऊ यांनी सांभाळ व शिक्षण दिले. त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांचा खूप जीव संभाजी राजा वरती होता. 👉 कोवळ्या वयात वडील छत्रपती शिवाजी महाराजांकडून संभाजी महाराजांना राजकारणाचे धडे मुघल दरबारातील घडाम