चंद्रसेन देवाची यात्रा 2023 किल्ले वसंतगड-तळबीड, निमसोड
चंद्रसेन देवाची भव्य यात्रा. निमसोड ता. खटाव जिल्हा सातारा जर वर्षी प्रमाणे या वर्षी मौजे निमसोड व किल्ले वसंतगड -तळबीड येथील यात्रा सोमवार दिनांक 17/04/2023ते गुरुवार दिनांक 20/04/2023 अखेर भरणार आहे. यात्रे निमित्त जर वर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमाचे नियोजन यात्रा कमेटी व चंद्रसेन भक्तान मार्फत करण्यात येत असते. सोमवार दिनांक 17/04/2023रोजी किल्ले वसंतगड येथील श्री चंद्रसेंन महाराज यांची मूळ ठाणाची यात्रा आहे.त्या निमित्त शेकडो वर्षा पासूनच्या ऐतिहासिक व प्राचीन परंपरेप्रमाणे विविध जिल्ह्यातुन वेगवेगळ्या गावातून मुळठाण असणाऱ्या श्री चंद्रसेन देवाच्या प्राचीन मंदिर किल्ले वसंतगड येथे जर वर्षी येतात. 🚩पूर्वीच्या काळी चंद्रसेन भक्त यात्रेच्या आधी चार-पाच दिवस आधीच शासनकाठी अर्थात सासनकाठी घेऊन चालत विविध गावातून नियोजित मार्गाने मुख्य यात्रेच्या आदल्या दिवशी किल्ले वसंतगडावर येत असत. परंतु आत्ताच्या आधुनिक युगामध्ये ट्रक टेम्पो विविध प्रकारच्या वाहनातून चंद्रसेन भक्त यात्रेच्या पहाटे किल्ले वसंत गडावरती पोहोचतात. 🚩किल्ले वसंतगडावरील श्री चंद्रसेन