आरमार
आरमार - "स्वराज्य निर्मितीचा गडकिल्ले आणि सह्याद्रीच्या साथीने सुरू झालेला अश्वमेध ,1656 साली जावळी बरोबरच रायरीच्या,स्वराज्यातील समावेशाने सागर किना-याला जाऊन धडकला." सह्याद्री, गडकोट, किल्ले, घोडदळ, पायदळ याच बरोबर आता गरज होती आरमाराची जावळी ,रायरी बरोबरच 1657 मध्ये कल्याण, भिवंडी ताब्यात आली येथुनच एक-एक पाऊल पुढे टाकताना सागरावर हुकुमत गाजविणा-या युरोपीयन सत्ताधीश,इंग्रज,पोर्तुगीज,फ्रेंच, डच,सिद्दी या बलाढ्य सत्ताधीशांशी महाराजांचा संपर्क आला. स्थानिक जनतेवर जुलुम,अत्याचार, लुट,जाळपोळ,आक्रमणे ही या सत्ताधीशांची नियमित कामे.आणि याच जुलमी राजवटीतून ,स्वराज्याचे पर्यायाने येथील प्रजेचे,रयतेचे ,रक्षण, संरक्षण करण्यास गरज होती सागरी वर्चस्वाची आणि आरमाराची.