रहिमतपूर हि प्राचीन वारसा लाभलेली विश्वविजेत्या दक्ष राजाची राजधानी.
रहिमतपूर हि प्राचीन वारसा लाभलेली विश्वविजेत्या दक्ष राजाची राजधानी... या भूमीतच दक्ष राजाची कन्या सतीने भगवान शिवशंकरास वर म्हणुन प्राप्त केले. दक्ष राजाने आयोजित केलेल्या विश्वशांती यज्ञास उपस्थित राहण्यासाठी आलेले ब्रम्हदेव व सकल देव गण याच भुमीतील तीर्थक्षेत्र ब्रम्हपुरी येथे मुक्कामास होते. येथेच भगवान शिवशंकर कुंभेश्वराच्या रूपाने प्रकट झाले होते. म्हणुनच अदिलशाहीपुर्वी या नगरीस “कुमठे कुंभेश्वराचे” या नावाने ओळखले जात होते. या कुंभेश्वराचे व त्याच्या रक्षणासाठी उभ्या असणार्या भैरोबाचे मंदीर आजही जागृत देवस्थाने म्हणुन प्रसिध्द आहेत. अशाप्रकारे अनादिकालापासून देवादिकांच्या पदस्पर्षाने पावन झालेल्या या भुमीत शिवछत्रपतींच्या आदर्शांपासून दूर जाणार्या पेशव्यांनाही अनेकवेळा हरवणार्या शौर्यधुरंधर, रणमर्द, श्रीमंत सरदार फत्तेसिंह माने यांनी आदिमाया महिषासुरमर्दिनीचे व मान्यांचे श्रद्धास्थान जोगेश्वरीचे रूप असलेल्या, दक्षिण भारतात मुळ ठाण असणार्या श्री. चौंडेश्वरी देवीची मुर्ती घोडयावरून ‘भाळवणी’ येथून आणुन या नगरीत स्थापन केली ते आर्इ जगदंबेचा अंश असलेले श्री चौंडेश्वरीचे जागृत म