स्वराज्याचे शिलेदार सुर्यराव काकडे
सुर्यराव काकडे सुर्यराव हे,छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते. अशा अनेक नोंदी आहेत. रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिवाजी महाराजानी ‘सुरराव काकडे दोन हजार हासम जावळीवर रवाना केले.’असा मोर्याच्या बखरीमध्ये उल्लेख आहेत. सुर्यराव यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला. त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली.ते एकून पातशहा कष्टी झाला,नि म्हणाला,’ काय इलाज करावा,लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले.आता कोण पाठवावे ‘तेव्हा पातशहाने ‘शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले. मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला.हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले.’हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून ये