वसंतगडावर असलेल्या चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामुळे उजाळा मिळतो.
धार्मिकतेच्या दृष्टीने रामायणात डोकावताना प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि बंधू लक्ष्मण वनवासात असताना त्यांचा वावर या शहरासह परिसरात राहिला असल्याच्या अख्यायिका सांगितल्या जातात. त्याला वसंतगडावर असलेल्या चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामुळे उजाळा मिळतो. गडावरील वनराईत तपश्चर्या करीत असताना लक्ष्मणाकडील खड्ग शस्त्र नजर चुकीनं लागल्याने चंद्रसेनचे दोन्ही हात कोपरापासून तुटले.तरीहीत्या अवस्थेत तप पूर्ण करुन भगवान महादेवाचे चंद्रसेन आवतार आहेत. लक्ष्मणाने व राम देवांनी चंद्रसेनला कुलदैवत म्हणून तुझी पुजा केली जाईल असा वर दिला. त्यानुसार गडाच्या आसपासच्या काही गावांचे कुलदैवत म्हणून चंद्रसेन महाराजांची आजही तितक्याच भक्तीभावाने पूजा अर्चा केली जाते. मंदिरात सध्या असलेल्या मूर्तीच्या मुखवटा पाठीमागे असलेल्या पुरातन मुर्तीचे दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत दाखवले असून ते आजही पहायला मिळत असल्यामुळे या अख्यायिकेला दुजोरा मिळतो. अनेक घरंदाज मराठे घराणी चंद्रसेनाला आपले कुळदैवत मानतात.चंद्रसेन देवांची मूर्ती हीं रामायण काळातील आहे . जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महारा