चतुर्भुज वीरगळ कशी असते?तर मग चला पाहू.
एकाच शिळेवर चारही बाजुंनी शिल्पांकन केलेल्या विरगळीना स्तंभ वीरगळ किंवा चतुर्भुज वीरगळ म्हणतात. एकाच गावातील चार वीर युद्धात धारातीर्थी पडलेले असल्यास किंवा एकाच विराने चार युद्धात शौर्य गाजवलेले असल्यास असे चतुर्भुज वीरगळ उभारले जात असत. खाली दिलेली वीरगळ ही जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावातील श्री पिंपळेश्वर मंदिरा जवळ आहे..