पुण्याजवळच्या पिपळे सौदागर सारख्या आधुनिक शहरी भागात आज ही परंपारिक रूढी,परंपरा,शेती,आणि मातीची सेवा करणारे व्यवसायीक महेंद्र व महेशशेठचे वडील प्रगतशील शेतकरी कै.बाळकृष्ण झिंजुर्डे यांचा पशुसंवर्धनाचा आणि सेवेचा वारसा आणि मुलांना केलेल्या आदर्श संस्कारामुळेच आणि झिंजुर्डे बंधु नी नित्य नियमाने जपला या सेवेचे फळ म्हणूनच यंदाच्या जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या निमित्त झिंजुर्डे परीवाराच्या राजा व सोन्या या बैल जोडीला मान लाभला आहे.याचा सर्वांना अभिमान आहे.
श्री संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी देहू सोहळ्याचे प्रस्थान यंदा 10 जूनला होणार असून हा सोहळा 28 जूनला पंढरपूरला दाखल होईल. येथे 19 दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील. पालखी रथ ओडण्यासाठी बैल जोड्या कश्या निवडतात. बैलजोडीची निवड कोण करतात? दरवर्षी आषाढी वारीत बैलजोडीला मान असतो. हा मान आपल्याला मिळावा यासाठी अनेक मालक इच्छुक असतात. त्यात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष, विश्वस्त आणि प्रमुखांसोबतच सात वारकरी बैलजोडीच्या निवड समितीत असतात. बैलजोडीची निवड कशी केली जाते? - बैलजोडी मालक शेतकरी असायला हवा. - मालकांच्या कुटुंबियांची माहिती घेतली जाते. - कुटुंबीय वारकरी आणि माळकरी असायला हवेत. - वारीत सक्रिय सहभाग असायला हवा. - बैलांच्या अनेक जाती आहेत. त्यात सोरटी, जरशी आणि खिल्लार या बैलांच्या जातीचा समावेश आहे. त्यात खिल्लार जातीच्या बैलांची निवड केली जाते. - खिल्लार जातीचे बैल रांगडे असतात. त्यामुळे या बैलांना प्राधान्य दिलं जातं. - वशिंडाचा आकार तपासला जातो. - बैलाचे शिंग सारख