श्रीमंत सरदार तुळाजी माने यांचा वंशवृक्ष...श्रीमंत सरदार तुळाजी माने (इ.स.1650 ते ऑगस्ट 1726)
श्रीमंत सरदार तुळाजी माने यांचा वंशवृक्ष... श्रीमंत सरदार तुळाजी माने (इ.स.1650 ते ऑगस्ट 1726) "चौथाईचे पाटील" म्हणून प्रसिद्ध असलेले तुळाजी माने यांचे घराणे सुरवातीला बहामनी साम्राज्यात नामांकित सरदार होते;परंतु बहामनी साम्राज्याच्या विभाजनानंतर हे घराणे विजापूरच्या आदिलशाही साम्राज्याच्या सेवेत रुजू झाले . सरदार तुळाजी माने हे या घरान्यातील पहिले पुरुष जे की मराठेशाहीसाठी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांच्या सेवेत आले. तुळाजी माने हे संभाजी महाराज्यांसोबत जंजिरा मोहीम, गोवा मोहीम इ. अश्या अनेक मोहिमात सहभागी होते. इ.स 1699 मध्ये त्यांनी वर्धनगड येथे झालेल्या लढाईत पराक्रम केल्यामुळे श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना शाबासकी दिली. इ.स 1707 मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या सुटकेनंतर मराठेशाहीत झालेल्या गृहयुध्दात ते छत्रपती शाहू महाराज्यांच्या सोबत राहिले. त्यामुळे खुष होऊन महाराजांनी त्यांना रहिमतपूरच्या चौथाईच्या उत्पन्नाचे अधिकार दिले. इ.स. ऑगस्ट 1726 मध्ये उदाजी चव्हाण व रावरंभाजी निंबाळकर यांनी रहिमतपूर वर केलेल्