आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२१ जुलै
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ जुलै १६५८* औरंगजेब दिल्लीमधे तख्तनशीन गेल्याच महिन्यात औरंगजेबाने बाप शहाजहानला आग्र्यात तुरूंगात टाकले होते व त्यानंतर ६ जुलै रोजी औरंगजेब दिल्लीला आला व तेथील व्यवस्था लावुन तो २१ जुलै रोजी तख्तनशीन झाला. याच दिवशी त्याने स्वतःला 'आलमगीर गाझी' अशी पदवी धारण केली. आलमगीर म्हणजे जग जिंकणारा व गाझी म्हणजे धर्मवीर. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ जुलै १६६२* देशबांधवांना सोडवण्यासाठी इंग्रजांचा प्लॅन ! विजापूरची राणी बडी बेगम साहिबा आपल्या मक्केच्या यात्रेवरून हिंदुस्थानला परतायच्या बेतात होती आणि तिच्या आगमनावर इंग्रज लक्ष ठेऊन होते ! पण कशासाठी ? बड्या साहेबीणीचा आणि रायरी वर अडकून पडलेल्या इंग्रजांचा एकमेकांशी काय संबंध होता ? या दोघांचा काहीही संबंध नसला तरी इंग्रजांना असे वाटत होते की बड्या साहेबिणीला जर आपण पकडले तर आदिलशहा तिच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांवर दबाव आणेल आणि त्या बदल्यात आपल्याला रायरीच्या तुरुंगातील आपल्या देशबांधवांना सोडवून घेता येईल ! वास्तविक पाहता शिवाजी महाराजांवर अशा प्रकारे दबाव टाकून आपल्या देश