पुरातन काळी वाटसुरुना अश्या प्रकारच्या पान पोया होत्या.
शिरवळ येथील ऐतिहासिक पानपोई खालीलप्रमाणे दोन फोटो पुरातन कालीन पाणपोई 1200 वर्षांपुर्वी ह्या परिसरातून व ह्या घाटातून व्यापारी मार्ग होता.असं अभ्यासा अति लक्ष्यात येते. हा मार्ग मोठा व वर्दळीचा असणार हे ह्या पाणपोईच्या मोठ्या आकारावरुन लक्षात येते. ही पाणपोई सध्या भग्नावस्थेकडे वाटचाल करीत आहे. स्थानिक नागरिक प्रशासन व इतिहासप्रेमींनी जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. पाणपोईचे बांधकाम हे दगड उत्तमरीत्या योग्य आकारात घासून व दगडावर दगड रचून चुना, सीमेंट ना वापरता केलेले आहे व ते आजदेखील दिसुन येत आहे .आत दोन रांजण होते बहुतेक , त्या पैकी आत्ता एकच दिसतोय. तसेच सगळीकडे कोणीतरी गुप्तधनाच्या आशेने उकरून ठेवले आहे.की काय असंच जाणवतय. तिथे पहारेकरी नाही अन आजुबाजूला दारूच्या रिकाम्या बाटल्या कचरा पडलेला आहे. पूर्वीच्या काळात या ठिकाणी व्यवस्था पाहण्यासाठी पहारेकरी असावेत असा अंदाज बांधता येईल. ही पाणपोई थोडीशी झाडीत लपलेली असल्याने पावसाळ्यात दिसत नाही. 👉पोईचा घाट ही वास्तु स्थानिक लोकांना देखील माहित नाही किंवा नसावी? 👉कसे जाल पण पुणे - सासव