कदम वाडा, साप गाव (ता.कोरेगाव,जि. सातारा)
कदम वाडा, साप गाव (ता.कोरेगाव,जि. सातारा) महाराष्ट्र म्हणजे पराक्रमी पुरुषांची, नेतृत्वाची आणि त्यातून जन्माला आलेल्या सरदारांची भूमी. प्रसंगी दिल्लीच्या गादीला घाम फोडला तो या सरदारांनी मग त्यांनी लेच्यापेच्या सारखं का राहावं. त्यांनी आपला रूतबा राखला च पाहिजे, आणि तो दिसतो त्यांनी त्याकाळी बांधलेल्या वाड्यातून. मग तो वाडा भोरचा , जतच्या डफळ्यांचा, किंवा साप गावातील कदमांचा असो. हे वाडे साक्ष देतात ती मराठ्यांच्या वैभवाची, कर्तृत्वाची, सामर्थ्याची. साप गावात एका कडेला डौलदार उभा असणारा हा वाडा बघता क्षणी मनात भरतो. समोर भलेमोठे बुरुज त्यात कोंदलेला अणकुचीदार टोकांचा दरवाजा त्याचा वर नगारखाना. चांगली ५ फूट रुंदीची तटबंदी आणि ६ बुरुजांनी बंधिस्त आहे हा वाडा. वाडा २ मजली आहे आणि त्यात लाकडावर केलेले कोरीव काम अत्यंत देखणे आहे. तटबंदीच्या आत चौकोनी टाके आणि गोल विहीर आहे. वाडा अगदी एका भुईकोट किल्ल्यासारखा आहे. मुख्य वाडा २ चौकांचा व २ मजली आहे. वाड्यात दुसऱ्या मजल्यावर बैठक अजून सुस्थित आहे तीवरील लाकडी खांब आणि कोरीव काम रॉयल फील देतात. मुख्य गोष्ट अशी जाणव