इतिहासप्रसिद्ध भातवडी (भातोडी जि. नगर) गावानजीक #दौला_वडगाव आहे. तेथे एक निजामशाही गढी पाहावयास मिळते. या गावास दौला-वडगाव नाव पडले कदाचित निजामशाहीतील येथील सरदाराचे नाव दौलाखान अथवा दौलतखान असावे.
इतिहासप्रसिद्ध भातवडी (भातोडी जि. नगर) गावानजीक #दौला_वडगाव आहे. तेथे एक निजामशाही गढी पाहावयास मिळते. या गावास दौला-वडगाव नाव पडले कदाचित निजामशाहीतील येथील सरदाराचे नाव दौलाखान अथवा दौलतखान असावे. गावाच्या उत्तरेस ही गढी अजून आपले महाकाय बुरुज व भक्कम तटबंदी घेऊन खंबीरपणे उभी आहे. खालील दगडी व वरील विटांनी केलेले बांधकाम सुबक, रेखीव आणि देखणे आहे. दरवाजातून आत येताच सज्जावर चढण्यासाठी दगडी पायऱ्यांचा जिना आपल्यास वर घेऊन जातो. आतील बाजूस इमारतीच्या कमानी व दालनांचा भाग आढळतो. सध्या एक मुस्लीम कुटुंब तेथे वास्तव्य करीत आहे. प्रत्येक दालन शाही वैभवाच्या खुणा दाखवते. चुन्याचे प्लास्टर भिंतींना घट्ट चिटकून आहे. भिंतीवर उत्तम प्रकारच्या कमानी वास्तुशास्त्राचे दर्शन घडवितात. संपूर्ण गढीभोवती पूर्वी ३० फूट खोल खंदक होता. यावरुन सरदाराची संरक्षणव्यवस्था मजबूत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे तेथे एखाद्या मोठ्या सरदाराचे ठाणे असल्याचे सिद्ध होऊ शकेल. भातवडी येथून जवळच असून या गावी १६२४ मध्ये जे युद्ध झाले त्या युद्धाने भातवडी नाव शहाजीराजांच्या पराक्रमाशी जोडले गेले. पण भातवडी येथे गढी सध्य