औंध ता. खटाव येथील मंदिरा समोर असणारी प्रचीन दीपमाळ
सोळाव्या - सतराव्या शतकात आदिलशाहीचा अंमल कऱ्हाड, सातारा, करवीर या प्रांतावर होता. याच काळात मसूर व औंध या दोन परगण्यांची देशमुखी मसूरचे जगदाळे - पाटील यांच्याकडे होती. औंध परगण्यांत तेव्हा २७ गावे होती. तद्नंतर रक्ताजी रुपजी यांच्याकडे देशमुखी गेल्याचे उल्लेख आढळतात. १६ शतकात शिवाजींनी बादशाही विरुध्द अभारलेल्या बंडा मुळे त्रस्त झालेल्या आदिलशाहीने महाराष्ट्र मराठी संस्कृती राज्य धुळीत मिळवण्याचा चंग बांधला होता. तेव्हा अफजल खानाने तुळजापूर व पंढरपूर हि ठिकाणे फोडल्यावर औंधकडे मोर्चा वळवला तेव्हा औंधच्या पुजाऱ्यांनी श्रीयामाई देवीला लहानश्या देवळात बंध करून टाकले व तिच्या देवळाला मास्जिदीचे रूप दिले. तेव्हापासून यमाईच्या पुजाऱ्यांपैकी एका शाखेस (फकीर) पुजारी असे म्हणतात. यावेळी औंध मधील दीपमाळ व तिचे सौदर्य पाहून अफजल खानाचे सुध्दा तिला फोडण्याचे धाडस झाले नाही असे बॉम्बे गॅझेट मध्ये नोंद आहे. इ.स. १७०१ ते १८०६ पर्यंत परशुराम पंतप्रतिनिधी औंधच्या गादीवर राज्य करीत होते. १८०६ साली पेशवाई जप्त झाल्यानंतरच्या १८११ चा कालावधी वागळ्यास सर्वकाळ पंतप्रतिनिधींचा अंमल चलू राहिला. स