मुद्रांचा वापर कधीपासून सुरू झाला?
मुद्रांचा वापर कधीपासून सुरू झाला? कागदावर मुद्रा उमटवण्याला नेमकी कधी सुरूवात झाली याबद्दल नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण ज्यावेळी छापखाना सुरू झाला आणि कागद वापरात आले त्यावेळी मुद्रांचा वापर सुरू झाला असावा असा इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. पूर्वीच्या काळात पत्रव्यवहार करताना विश्वासार्हता जपण्यासाठी म्हणून मुद्रांची निर्मिती झाली. एका राजाने दुसऱ्या राजाला पाठवलेल्या पत्रातला मजकूर विश्वास ठेवण्यायोग्य आहे की नाही यासाठी मुद्रा हाच एकमेव पर्याय होता. त्यामुळं प्रत्येक राजाची स्वतंत्र मुद्रा होती. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत सांगतात, "हडप्पा आणि मोहंजोदोडो संस्कृतीतही मुद्रांचा वापर केल्याचे इतिहासात उल्लेख आढळतात. मध्ययुगीन काळापासून मुद्राचा वापर होत आलाय. हस्ताक्षर ओळखण्याचे किंवा हस्ताक्षराची ओळख पटवण्याची सोय नसल्यामुळे पत्रावर उमटवलेली मुद्रा हाच एक पर्याय होता. "विशेष म्हणजे ही मुद्रा खरी की खोटी हे देखील शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासलं जायच. लेखनप्रशस्ती शास्त्रानुसार मुद्रांचा वापर आणि ओळख पटवली जायची" शिवमुद्रा कधी तयार झाली? 1636 साली छत्रपती शिवाजी महाराज हे श