आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१३ जून १६६५
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१३ जून १६६५* पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री शिवाजीराजे आणि मिर्झाराजे यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता. त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या व औपचारिकतेचे बोलणे झाले निरोपाचे विडे दिले गेले, त्यानंतर राजे पुन्हा मिर्झाराजांकडे आले.. दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला त्यानुसार : १. महाराजांकडे लहान-मोठे २३ किल्ले, त्यातील १ लाख होणा (५ लाख रुपये) वसुलासह, शाही कृपेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात येतील. यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये. . २. दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी.. ३. शिवाजीपुत्र संभाजीला मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल. त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.) प्रती-शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेतोजी पालकरास सदैव दख्खच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल.. ४. वि