सर्वांत प्राचीन ज्ञात राष्ट्रकूट घराणे कुंतल देशात कृष्णानदीच्या खोऱ्यात राज्य करीत होते.
सर्वांत प्राचीन ज्ञात राष्ट्रकूट घराणे कुंतल देशात कृष्णानदीच्या खोऱ्यात राज्य करीत होते. त्याचा मूळ पुरुष मानांक (सु. कार. ३५०–७५) हा होय. याने आपल्या नावे मानपूरनामक नगर स्थापून तेथे आपली राजधानी केली. हे मानपूर सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्याचे माण असावे. ह्या राष्ट्रकूट नृपतींना कुंतलेश्वर म्हणत. विदर्भाचे वाकाटक आणि कुंतलचे राष्ट्रकूट यांची राज्ये एकमेकांना लागून असल्याने त्यांच्यामध्ये वारंवार कटकटीचे प्रसंग उद्भवत. मानांकाने विदर्भाला त्रस्त केले होते, असे राष्ट्रकूटांच्या पांडरंगपल्ली ताम्रपटात म्हटले आहे; तर वत्सगुल्म (वाशीम) च्या विंध्यसेन वाकाटकाने कुंतलेशाचा पराजय केल्याचा उल्लेख अजिंठ्याच्या लेखात आला आहे. मानांकाचा पुत्र देवराज याच्या काळी गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य) याने आपला राजकवी कालिदास याला या कुंतलेश राष्ट्रकूटांच्या दरबारी वकील म्हणून पाठविले होते. या प्रसंगाने कालिदासानेकुंतलेश्वरदौत्य रचले होते. ते आता उपलब्ध नाही; पण त्यातील काही उतारे राजशेखर व भोज यांच्या अलंकार ग्रंथांत आले आहेत. मानपूर येथे हे घराणे बादामीच्या दुसऱ्या पुलकेशीच्या (कार. ६१