कुलदैवतांचे टाक आणि कुळाचार, जाणून घ्या कसा असावा आपल्या घरातील
*मराठ्यांचा इतिहास : कुलदैवतांचे टाक आणि कुळाचार, जाणून घ्या कसा असावा आपल्या घरातील देव्हारा* अनादी काळापासुन मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रुपात पहात आला आहे व त्याचे विविध रूपातून पुजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पुजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देवून त्याचे मंदिर उभारून पुजा करू लागला अश्या अनेक देव देवतांमधील कुलदैवतांचे स्थान त्याच दृष्टीने महत्वपूर्ण. या कुलदैवताचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत, त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पुजले जातात. कुलदैवतांचे टाक धातू पासुन बनलेले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजुस राळ / लाख लावून मागील बाजुने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोड विरहित असावा असा संकेत आहे. निसर्गाच्या मुळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच सं