इनाम आणि वतन जमिनी*
*इनाम आणि वतन जमिनी* ब्रिटिश राजवटीत, सन १८६० ते १८६२ या दरम्यान ‘इनामकमिशन’ ने चौकशी करून खालील बारा बलुतेदारांनाइनामाची सनद प्रदान केली. १ .पाटील २. कुलकर्णी (गावाचा रोखपाल), ३. सुतार ४.लोहार ५. चांभार ६. कुंभार ७. न्हावी ८. परीट ९. जोशी (ब्राम्हण) १०. गुरव (धर्मगुरु) ११. सोनार १२. महार. ब्रिटीश सरकारने वतनाचे तीन वर्ग केले होते १. सरकार उपयोगी वतन: यात पाटील, राव, खोत, गावडा,गावकर, नाईक, कुलकर्णी, पांड्या, कर्णिक, चौगुला इत्यादी वतने होती. २. रयत उपयोगी वतन: यात जोशी, गुरव, जंगम, काझी,सुतार, लोहार, चांभार इत्यादी वतने होती. ३. सरकार व रयत यांना निरुपयोगी वतने: यात सोनार,शिंपी, तेली, माळी, तांबोळी, गवंडी, कसार इत्यादी वतने होती. *पूर्वी खालील प्रकारचे सात इनाम अस्तित्वात होते:* *इनाम* वर्ग-१: सरंजाम, जहागीर व इतर तत्सम राजकीयकामाच्या मोबदला म्हणून दिलेली जमीन. *इनाम वर्ग-२:* जात इनाम-एखाद्या व्यक्तीने केलेल्या भूषणावह कामगिरीबद्दल दिलेली जमीन. *इनाम वर्ग-३:* देवस्थान इनाम- देवदेवता किंवा अन्य धार्मिकस्थळांच्या व्यवस्थेसाठी दिलेली जमीन. *इनाम वर्ग- ४:* देशपांडे/देशमुख/कुलकर्णी इन