कागल हाऊस या नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू
जवळपास एक शतकाहून अधिक वर्षापूर्वी बांधलेली आणि त्या काळात कागल हाऊस या नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरातील ऐतिहासिक अशी व सर्व सोयीनियुक्त इमारत स्व. बापूसाहेब घाटगे महाराज यांनी त्यावेळी शासनास (जिल्हा परिषदेसाठी) दिली. इ.स. 1910 साली बापूसाहेब महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बांधलेल्या या वास्तूचे आता नूतनीकरण करण्यात येणार आहे. ही बातमी आम्हाला आजच समजली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याशी या इमारतीचे नाते ऋणानुबंधाचे आहे. विशेष म्हणजे आज बापूसाहेब महाराज यांची जयंती आणि याच बापूसाहेब महाराजांनी बांधलेल्या या सुंदर अशा वास्तूचे जिल्हापरिषदेमार्फत नूतनीकरण करण्यात येणार असल्याची बातमी आजच समजावी, हा एक सुंदर असा योगायोगच!.