शिंदे घराण्याचे संस्थापक राज्यकर्ते राणोजी शिंदे
👉1737 ते 1880 मध्ये उज्जैनवर शिंदे घराण्याचे एकछत्र अमल होता. 👉त्या काळात उज्जैनचा खुप विकास झाला.उज्जैन ही शिंदे राज्यकर्त्यांची राजधानी होती. 👉महाराष्ट्रात शिंदे घराने म्हणून आहे. शिन्दे घराणे अथवा हिन्दीमध्ये सिन्धीया हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होत. 👉मराठेशाहीतील एक पराक्रमी घराणे व भूतपूर्व ग्वाल्हेर संस्थानचे संस्थापक राजघराणे. कण्हेरखेड (जि.सातारा) येथील पाटीलकी या घराण्याकडे होती. 👉शिंदे हे औरंगजेबाच्या पदरचे मनसबदार असल्यामुळे बादशहाने छत्रपती शाहूंशी त्यांची सोयरीक करून दिली होती. छ. शाहू औरंगजेबाच्या कैदेत असतानाच ही शिंद्यांची मुलगी मरण पावली. दत्ताजीचा मुलगा जनकोजी हा बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या पदरी होता मात्र त्याविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. ह्याचा मुलगा राणोजी होय. राणोजीपासूनच शिंदे घराणे पुढे आले. 👉राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते. 👉मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिन्दे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठावरील कण्हेरखेडे या गावचे पाटील होते. राणोज