Posts

Showing posts with the label सांगलीचा इतिहास इ. स.* *१०२४ ते इ. स.**१९७७ :-*

सांगलीचा इतिहास इ. स.* *१०२४ ते इ. स.**१९७७ :-*

*सांगलीचा इतिहास इ. स.* *१०२४ ते इ. स.* *१९७७ :-* १०२४ :- गोंक या शिलाहार राजाच्या ताब्यात ' मिरिच' (मिरज) व ' करहाटक' (कराड) व दक्षिण कोंकण हा प्रांत होता. यातच सांगलीचा भूभाग समाविष्ट होता. १२०५ :- शिलाहार राजा गंगादित्य याने मिरज भागांत इसकुडी येथे तलाव बांधला. कोल्हापूर, मिरज, शेडबाळ व तेरदाळ येथे याबाबतचे शिलालेख आहेत. १२५० - १३१८ :- देवगिरीच्या यादव राजानी या भागावर राज्य केले त्यावेळी ' मिरिच' प्रांतात तीन हजार गांवे होती. १३१९ - १३४७ :- दिल्लीच्या खिलजी व तुघलकानी या भागावर राज्य केले. १३४८ - १४८९ :- बहामनी सुलतानानी या भागावर राज्य केले. १४९० - १६५९ :- विजापूरच्या अदिलशहाने या भागावर राज्य केले. यावेळी मिरज प्रांत रायबाग महालात होता. १६५९ :- छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती नेताजी पालकर याने हा भाग जिंकून घेतला. परत अदिलशहाने हा भाग जिंकून घेतला. १६७२ :- पन्हाळयापासून मिरजे पर्यंतचा सर्व भाग शिवाजी महाराजांनी जिंकला. या नंतर मुसलमान सरदार विजापुरास निघून गेले. तेव्हापासून या भागाची सरदारकी मिरजेचे सरदार कदम यांच्याकडे होती. १७३०:- बाजीराव बल्लाळ पेशवे