श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४
श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त छबिना १३/११/२०२४ निमसोड गावात श्री सिद्धनाथ देवाची मोठी यात्रा भरते. मंदिरासमोर तुळशीविवाह लावला जातो. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित असतात. दिपमाळला तेल घातला जात.तुळशी विवाह दिवशी छबिना निघतो. श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त छबिना व्हिडिओ श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त श्रींची रथातून मिरवणूक प्रारंभ दुसरा दिवस म्हणजे मुख्य दिवस सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं जय घोषत उत्साहात यात्रा पार पडते. हजारो भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करतात.सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं जय घोषत निमसोड नगरी दुमदुमून जाते. रथावर अक्षरशहा पैशाचा पाऊस पडतो. नाथबाबा चा वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असतो. सकाळी मानकरीयांचे धज दीप माळ ते मंदिराचा कळस असे वाजत गाजत मिरवणूकीत बांधले जातात. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उत्सवाला सुरुवात होते. गावातील ग्रामस्थ मानकरी उपस्थित श्रीफळ वाढवून पूजन केले जाते. श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त रथयात्रा निमसोड चे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेला हजारो भाविक उपस्थित असतात. गुलाल खोबऱ्याची उधळन होते.