आषाढी एकादशी विशेष कथा
आषाढी एकादशी विशेष नारदमुनींच्या सांगण्या वरुन त्या रात्रीच श्रीकृष्ण रुक्मिणींनी पुढल्याच दिवशी तातडीने द्वारकेला निघण्याचा निर्णय घेतला. तथापि निघण्यापूर्वी पंढरीच्या लोकांचे निरोप घेण्यासाठी, श्रीकृष्ण प्रथम पुंडलिकाला भेटण्यास त्याच्या कुटीकडे आले. आदल्या रात्रीच्या पावसामुळे त्याच्या कुटीसमोर इतस्ततः चिखल पसरली असल्याने त्यांनी अंगणातुनच पुंडलिकास हाक दिली. साक्षात "विष्णुदेव" आपल्या दाराशी आलेले पाहून तो गहिवरला. आणि आदरभावे म्हणाला, " पांडुरंगा माझ्या आईवडिलांची मी प्रातर्विधी उरकत असल्याने कृपया तुम्ही कुटीत येऊ नका. मी थोड्याच वेळेत बाहेर येईन ". श्रीविष्णुंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून पुंडलिकानं आपल्या हाताजवळच असलेली एक विट उचलली आणि त्याला मनोभावे नमस्कार करून स्वतःच्या व आईवडिलांच्या माथी स्पर्श करून ती त्याने अंगणात टाकली. आणि पांडुरंगास विनंती केली की "मी बाहेर येईस्तोवर कृपया तुम्ही ह्या विटेवर उभे रहा."श्रीकृष्णाने देखील आपल्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन आपले दोन्ही हात कटिवर ठेवून भोळसपणे त्या विटेवर उभे राहून