वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर निर्माण राष्ट्रकुट कृष्ण राजा
वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर राष्ट्रकूट राजे यांनी निर्माण केल. राष्ट्रकूट हे इ. स 753 - 982 या कालखंडादरम्यान भारताच्या दक्षिण व मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे या काललखंडात राष्ट्रकूटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले. राष्ट्रकूट राजघराणे याच्या भरभराटीच्या काळात राष्ट्रकूटांचे सत्ता ही विध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्ग घराण्यातील प्रथम सत्ताधीश त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती कृष्ण राजा पहिला याने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर निर्माण केले.