आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ एप्रिल १६५७* मराठ्यांनी रघुनाथ बल्लाळ अत्रे समवेत दाभोळ व आसपासची ठाणी जिंकली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ एप्रिल १६५७* औरंगजेबाचे शिवाजीराजांना मेहेरबानीचे पत्र शिर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटले असेल परंतु, असे खरेच झाले होते. मात्र त्यामागची पार्श्वभूमी व त्यानंतर काय घडले हे लक्षात घेणे अगत्याचे ठरेल. अगदी लहान वयातच शिवाजीराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्याद्रुष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली. हळुहळु काही प्रदेश तसेच किल्ले त्यांनी जिंकुन घेतले. इस १६३६ मधे मुघल व आदिलशहात एक महत्वाचा तह झाला होता. त्या तहानुसार जिंकलेल्या निजामशाहीतील बालाघाट प्रदेशातील बरेचसे किल्ले मुघलांकडे तर, कोकणातील किल्ले आदिलशहाकडे राहणार होते. मात्र मधल्या काही वर्षात शिवाजीराजांनी जे किल्ले कधी भेद करून तर कधी लढुन जिंकले त्यातले बरेचसे किल्ले हे त्या १६३६ च्या तहानुसार मुघलांकडे असायला हवे होते. पण प्रत्यक्षात ते आदिलशहाकडे होते व शिवाजीराजांनी ते स्वराज्यात आणले याचे कारण नेमके समजत नाही पण बादशहा शहाजहानचे दख्खनकडे झालेले दुर्लक्ष व आ