कोल्हापूर छत्रपति संस्थानच्या विशाळगड जहागीरदार पंतप्रतिनिधींचा हा वाडा!
विशाळगड संस्थानच्या पंतप्रतिनिधींचापंतप्रतिनिधींचा हा वाडा! सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानचे पंतप्रतिनिधी आणि हे विशाळगडाचे पंतप्रतिनिधी वेगळे बर का! कृष्णराव भाऊसाहेब प्रतिनिधी यांनी १८९० मध्ये फोटोत दिलेला वाडा बांधला. यालाच विशाळगड हाऊस अथवा मलकापूर बंगला असे म्हणतात. उजव्याबाजूला समोर झाडांनी वेढलेला, बाजूला बांबूंच्या झाडांच्या विळख्यात असणारा हा वाडा नजरेस पडला. विशाळगड कंपाऊंड असे या भागाचे नाव असल्याने साहजिकच या भागात काही ऐतिहासिक आहे का, हे पाहण्यासाठी उत्सुक होतो आणि ते मिळालं. सध्या पंतप्रतिनिधींची वंशज इथे राहतात. त्यांच्या सासरचे आडनाव आता 'घण' असे आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील एकूण ५ जहागीरदारांचे संस्थान होती. ती सर्व कोल्हापूर छत्रपति च्या जहागिरी. १. विशाळगड, २. बावडा, ३.कापशी, ४.कागल, ५. इचलकरंजी. १८९२ मध्ये आबाजीराव कृष्णराव उर्फ आबासाहेब विशाळगड संस्थानाचा कारभार पाहत होते. विशाळगडाच्या पंतप्रतिनिधींचे आडनाव 'जयकर' आहे असे ऐकले होते, "ते चुकीचे लिहिले गेले आहे एका पुस्तकात माहिती देताना", असे 'उदयजी घण' यांनी सांगितल