हा उल्लेख आधीच्या वेरूळचा !
वेरूळच्या लेणीखाली वसलेले होते गुप्त नगर ! जागतिक वारसास्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांखाली कधीकाळी एक गुप्त नगर वसलेले होते, अशी नवीच माहिती समोर आली आहे. या नगरवासियांना हवा, पाणी व प्रकाश मिळावा यासाठी केलेली व्यवस्था अाजही काही प्रमाणात उपलब्ध आहे. लीळाचरित्र तसेच पाश्चात्त्य तज्ज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांतही या गुप्त नगरीचा उल्लेख आढळला आहे. शत्रूंपासून लपण्यासह मौल्यवान खजिना दडवण्यासाठी तसेच कारागिरांच्या निवासासाठी याचा वापर होत असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. या नगरीवर आणखी संशोधन व्हावे, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर्मन पत्रकार अाणि कैलास लेणीच्या अभ्यासिका क्रिस्टल प्लित्झ यांनी वेरूळच्या लेणीखाली गुप्त शहर असल्याचा दावा केला आहे. याबाबत यू-ट्यूबवहि काही संशोधकांनी व्हिडिओ अपलोड केले अाहेत. या दाव्याची सत्यता पडताळली. संशाेधकांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे दिले आहेत. कैलास लेणीत एक अायताकृती बाेगदा आहे. काही अंतर पार करून गेल्यावर ती ९० अंशात वळते आणि पुढे निमुळती होत जाते. यापुढे ती कोठे जाते याची कोणालाच माहिती नाही. काहींच्या मते ती पु