जल व्यवस्थापनाचा अजोड नमुना
जल व्यवस्थापनाचा अजोड नमुना - राणीची विहीर उत्तर गुजरातच्या पाटण येथील प्राचीन, नक्कशीदार आणि अनोखी अशी राणीची विहीर (स्टेपवेल) आहे. १ हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या विहिरीचे वैशिट्ये म्हणजे या विहिरीत ७ मजली भव्य राजवाडा आहे. ही विहीर म्हणजे तंत्रज्ञानाचे एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचे मानले जाते. भूमीगत जल वापर आणि जल व्यवस्थापनाचा हा अजोड नमुना असल्याचे मत युनेस्कोने व्यक्त केले आहे. त्यामुळेच यूनेस्कोने या राणीच्या विहिरीला २०१४ मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये स्थान दिलंय. रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून नवीन १०० रूपयांची नोट जारी केली गेली. या नोटेच्या मागच्या बाजूला राणीच्या विहिरीचा फोटो देण्यात आला आहे. या फोटोचा वापर देशाची संस्कृती दर्शवण्यासाठी नोटेवर करण्यात आला आहे. राणीच्या विहिरीची निर्मिती रानी की वाव इ.स. १०६३ मध्ये राणी उदयमतीने आपला दिवंगत पती राजा भीमदेव याच्या स्मरणार्थ बांधली होती. सुमारे सात शतके ही मौल्यवान वास्तू सरस्वती नदीचे पाणी आणि गाळात रूतलेली होती. १९८० च्या दशकात भारतीय पुरातत्त्व खात्याने या विहिरीचे उत्खनन केले असता ही सातमजली खोल, पायऱ्यांची आणि कलाकुसरीचे नक्षी