स्वातंत्र्यासाठी क्रांतीज्योत तेवत ठेवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज जयंती त्या निमित्ताने विनम्र अभिवादन.#क्रांतिसिंहनानापाटीलजयंती #क्रांतिसिंह #स्वतंत्रलढा #प्रतिसरकार
१९४६-१९४७ पर्यंत सातारा सांगली भागातील १५०० हजार पेक्षा बहुदा जास्त गावात स्वतंत्र घोषित करून आशिया खंडातील पहिलं प्रतिसरकार स्थापन करणारे, स्वतंत्र फौज निर्माण करणारे, स्वतंत्र न्याय निवाडे, तंटे मिटवणारे, गावगुंड आणि दरोडेखोरांना , फितुरांना पकडून त्यांच्या पायामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पत्रा ठोकायचे. त्यामुळे लोक या प्रति सरकारला पत्री सरकार असे म्हणू लागले.इंग्रज त्याना पकडण्यासाठी मोठं मोठी इनामे लावत.भूमिगत चळवळ निर्माण करून नांनानी प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण खेडेगावातनी इंग्रजांचं अस्तित्व नावापुरते राहिले. नाना पाटील यांनी तरुण कार्यकर्तेयांची संघटन करून स करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान दिल.नाना बराच काळ भूमिगत राहून प्रति सरकार चालवत होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बिकट प्रसंगाला कसे तोंड दिलं. असं कित्येकदा भाषणामध्ये संदर्भ देऊन सांगत असत.. एक असा प्रसंग आला..की क्रांतीसिंह नाना पाटलांच्या आईच निधन झालं... त्यामुळे संपूर्ण गावाला इंग्रजांनी वेडा दिला. भूमिगत अस