महाराणी बायजाबाई शिंदे इतिहास
महाराणी बायजाबाई_शिंदे. आज १५८ वा स्मृतिदिन विनम्र अभिवादन 👉आज ग्वाल्हेरच्या शिंदे (सिंधिया) घराण्याची राणी असं म्हटलं की डोळ्यासमोर राजमाता विजयाराजे सिंदिया यांचं नाव आणि प्रतिमा समोर येते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी भारतीय राजकारणात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे. 'राजमाता' या त्यांच्या ओळखीमुळे त्यांची ग्वाल्हेरची राणी ही प्रतिमा आपल्या डोळ्यात येते. 👉पण विस्मरणात गेलेल्या ग्वाल्हेरच्या महाराणी आहेत. त्या राणी म्हणजे बायजाबाई शिंदे. या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील संस्थानिक सरदार घराण्यातील होत्या . कागलच्या या मुलीने केवळ शिंदे घराण्याची सून म्हणून नाव कमावलं नाही तर अत्यंत दोलायमान राजकीय स्थितीत ग्वाल्हेर संस्थानचा कारभार पाहिला. 👉 बायजाबाई शिंदे यांच्या कर्तृत्वाचं वर्णन अनेक देशी-विदेशी इतिहास अभ्यासकांनी केलं आहे. 👉घाटगे घराण्याचा ग्वाल्हेरशी संबंध कसा आला? कागल येथिल देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे परशुराम पटवर्धन यांच्याक