शिंदे घराण्याचा इतिहास
शिंदे घराणे शिंदे घराण्याचा इतिहास श्रीरामवरदायिनी ही शिंदे घराण्याची कुलस्वामिनी आहे. इ.स. १५१०/१२ चे दरम्यान ज्यावेळी रामाजीराव रविराव शिंदे हे कोकण प्रांती बहामनीकडुन स्वारीवर आले त्यावेळी एका साधुपुरषाने त्यांस श्रीरामवरदायिनीची मूर्ती आपले झोळीतून काढून दिली व हीला तुझी ‘कुलस्वामिनी’ मान, ही तुला स्वारीत यश देईल असे सांगितले त्याप्रमाणे ते वागले व श्रीनेही त्यांस यश दिले. अंजनवेल दाभोळ तर्फे चिपळूण देहायतिवरे बांदरी दसपटी कुडाळ तथा दादर गावी वैतरणेच्या तिरी श्रीरामवरदायिनी मंदिराचा जीर्णोध्दार (इ.स. १८५०) दसपटी शिंदे मोकाशी व कदम मोकाशी यांनी कुलदैवताची रुपी घडवून प्राण प्रतिष्ठा केली आहे. पूर्वकाळापासून न्यायनिवाडे झाले आहेत. मजरे दादर हे श्रीचे करिता इनाम मोकासा इ.स. १५२०/२२ चे दरम्यान दसपटीकर यांस दिले असून त्यानंतर शिवछत्रपती, संभाजीराजे, महाराणा ताराबाई, शाहू छत्रपती यांनी श्रींच्या सनदा रुजू करुन दिल्या आहेत. श्रीचे मंदीरासमोर झोलाई, मानाई, त्रिंबकी अशी तीन देवस्थाने आहेत. शिंदे घराण्याचे ऐतिहासिक अस्तित्व महाराष्ट्रात इ.स.पूर्वी ६०० च्या सुमारास आर्यांनी वस्ती केली. याच