Posts

Showing posts with the label राष्ट्रकुट हे हिंदू असून शिवोपासक होते

राष्ट्रकुट हे हिंदू असून शिवोपासक होते. अनेक शिवमंदिरे निर्माण केली असं उल्लेख मिळतात.

राष्ट्रकुट हे हिंदू असून शिवोपासक होते. कृष्णराजाचे कृष्णेश्वर हे कैलासलेणे हे एक शिवमंदिरच आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी अठरा शिवमंदिरे बांधल्याचा उल्लेख राष्ट्रकूटांच्या कोरीव लेखांतून येतो. वेरूळाप्रमाणेच घारापुरी येथे राष्ट्रकूट राजांनी कित्येक शिवकथा प्रसंग साकार केलेले आहेत याशिवाय इतरही अनेक शिवमंदिरे राष्ट्रकूट राजांनी बांधलेली होती.               त्यांच्या मंदिरांपैकी पहिल्या अमोघवर्षाने  वसविलेल्या मान्यखेट राजधानीजवळ कागना व वेण्णीतोरा या नद्यांच्या संगमाजवळ राष्ट्रकूट काळातील एका दगडी दुर्गाचे अवशेष आढळले. आता गावही ओसाड झाला आहे. त्यात एक महादेवाचे व दुसरे जैन मंदिर आहे. जैन मंदिरात पार्श्वनाथ, महावीर आदी तीर्थंकरांच्या त्यांच्या लांछनांसह प्रमाणबद्ध मूर्ती आहेत. तिसरा कृष्ण (कार. ९३९-६७) या राजाने रामेश्वरम्‌पर्यंत प्रदेश पादाक्रांत करून तिथे आपला विजयस्तंभ उभारला.       रामेश्वरम्‌जवळ त्याने कृष्णेश्वर आणि गंडमार्तंडा ही दोन आणि कांची येथे कालप्रियाचे मंदिर बांधण्यासाठी गावे दान दिली. मार्कंडादेव येथील मार्कंडी अथवा मार्कंडेश्वर हे मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगेच्या ती