२३ जून
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ जून १५६४* गोंडवानाची महाराणी, राणी दुर्गावती २३ जून १५६४ साली मोगलांनी सेनापती आसफखांच्या (मूळ नाव सुभेदार ख्वाजा अब्दुल मजीद खां) नेतृत्वाखाली गोंड राज्यावर मोहीम काढली ( या अगोदर १५६२ रोजी सुद्धा आसफखांने गोंडवर आक्रमण केले होते परंतु राणीने त्याला पराजित केले होते. या युद्धामध्ये मोगलांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि एका स्त्री कडून पराजय होणे हे आसफखांला खूप टोचले होते) जबलपूरच्या आसपास मोठे युद्ध झाले ज्यामध्ये मोगलांचे जवळपास तीन हजाराहून जास्त सैन्य मारले गेले. राणीचेही मोठे नुकसान झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२३ जून १६६१* हिंदुस्थानातील मुंबई बेट इंग्लंडच्या राजास बहाल इंग्रज आणि डच पोर्तुगीजांना जड जाऊ लागले. इंग्रजानी तर पोर्तुगीांचा सर्वत्र पिच्छा पुरविला होता. त्यांना स्वतःच्या हिमतीने तोंड देणे पोर्तुगीजाना कठीण गेल्याने त्याना समेट करावा लागला. इ. स. १६६१ साली इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. पोर्तुगालच्या राजाने इंग्लंडची सदिच्छा संपादन करण्यासाठी आपली कन्या कॅथरिना ही इंग्