दाभाडे घराणे
दाभाड्यांचा मूळपुरुष येसाजी हा तळेगाव (दाभाडे) (तालुके मावळ जिल्हा पुणे) येथील रहिवासी व मुकदम होता. दाभाडे क्षत्रिय असून यांचें गोत्र शांडिल्य व देवक कळंबाचें आहे. येसाजी हा शिवाजीमहाराजांचा हुजर्या होता. महाराज आग्र्यास गेले असतां येसाजीनें इकडे राजकुटुंबाची सेवा केली. येसाजीचा थोरला मुलगा खंडेराव होय. राजाराम छत्रपती हे जिंजीस जातांना येसाजीसह खंडेराव हा त्यांच्याबरोबर गेला होता. जिंजीस राजाराम यांनां संभाजी हा पुत्र झाला, तेव्हां त्यांनीं येसाजीस तळेगांव, इंदुरी, धामणें आणि उरसें हीं गांवें इनाम करून दिलीं. राजाराम हे जिंजीहून परत येत असतां मागें जनान्याच्या बंदोबस्तास येसाजी यास ठेवलें होतें. त्यानें मोठ्या युक्तीनें जनानखाना किल्ल्यांतून काढून अनेक संकटांतून पन्हाळ्यास आल्यावर येसाजी मेला. राजाराम हे जिंजीस जात असतां मोंगल मागें लागला होता. तेव्हा (खंडेरावाचा धाकटा भाऊ) शिवाजीनें त्याला पाठीवर घेऊन दौड मारली असता त्याची छाती फुटून व रक्ताच्या गुळण्या होऊन तो मेला होता. पन्हाळ्यास आल्यावर छत्रपतींनीं खंडेरावास सेनाधुरंधर हें पद देऊन गुजराथ व बागलाणकडे मुलुखगिरीवर पाठविलें आण