आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ एप्रिल १६४५* हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली. सह्याद्रीतील प्राचीन रायरेश्वर मंदिराला शिवाजी छत्रपतींमुळे अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपली स्वराज्याची संकल्पना त्याची दूरदृष्टी काही मोजक्या परंतु विश्वासू आणि जिवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते आणि सोनोपंत डबीर अशा बारा मावळातील सवंगडी यांच्या समोर मांडली. त्या दिवसापासून सुरुवात झाली इतिहासातील काही सोनोरी क्षणांना, पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात एकजूट होऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ एप्रिल १६८०* राजापूरच्या इंग्रजांनी आपल्या आपल्या वरीष्ठास पत्रे लिहून कळवले कि, छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ठीकठिकाणच्या सुभेदारास व हवालदारास त्याने आपल्यापाशी बोला