Posts

Showing posts with the label चऱ्होलीकर सरदार दाभाडे

चऱ्होलीकर सरदार दाभाडे

Image
चऱ्होलीकर सरदार दाभाडे बजाजी दाभाडे पाटील तळेगाव दाभाडे यांना दोन मुले होती पहिले येसाजीराव व दुसरे सोमाजीराव होय सोमाजी बिन बजाजी दाभाडे च-होली गावच्या वतनावर आले च-होली सरदार दाभाडे घराण्यातील सोमाजीराव दाभाडे हे  मूळ पुरुष होय सोमाजी दाभाडे यांना दोन मुले होती थोरले कृष्णाजी व धाकटे बाबुराव होय कृष्णाजी दाभाडे यांचा अनेक ऐतिहासिक पत्रांमध्ये उल्लेख आढळतो  छत्रपती_शाहू_महाराज शाहू महाराज १६९० पासून महाराणी येसुबाईसाहैब यांचे सोबत औरंगजेब च्या कैदेत होते. औरंगजेबच्या शेवटच्या काळात शाहू राजांना सोडवण्यासाठी ज्या मराठा सरदारांनी प्रयत्नांची शिकस्त केली त्यामध्ये सरदार कृष्णाजी दाभाडे चऱ्होलीकर ही होते.    छत्रपती शाहू महाराज यांनी सुटकेनंतर दाभाडे घरण्यावर  महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या स्व पराक्रमाचा जोरावर त्यांनी त्या सार्थ केल्या । शाहू महाराजांनी  खंडेराव दाभाडे यांना सेनापती पदी नियुक्त केले तर कृष्णाजी दाभाडे यांना सुभेदार व सेनाबारासहश्री म्हणून नेमले . महाराणी येसूबाई यांची दिल्लीहून सुटका करण्यासाठी गेलेल्या मराठा सैन्यात कृष्णाजी दाभाडे हे सुभेलष्कर म्