Posts

Showing posts with the label देशमुख देसाई

महाराष्ट्रातील घार्गे घराणे

Image
घार्गे घराणे:-देसाई देशमुख सरदेशमुख   या घराण्याचे पूर्वज महाभारतातील यशोवर्धन राजाचे वंशज आहेत. असे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत.  हे मूळचं राजस्थान मधील रतन सिंह उर्फ रानोजी यांच्या शाखेतील. हे उच्चकुलीन मराठा घराणे. आज महाराष्ट्र मध्ये नांदत आहे.  या घराण्याला इसवी सन 1342 साली दिल्लीचे बादशहा मोहम्मद बिन तुघलक यांनी एका मोहिमेवर प्रसन्न होऊन. महाराष्ट्र मध्ये निमसोड येथे सरदेशमुखी व देशमुखी देऊन दक्षिणे मध्ये पाठवले. तेव्हापासून हे घराणे निमसोड  याठिकाणी नांदत आहे.  या घटनेनंतर या घराण्यामध्ये 1536 विजापूर बादशहा  कडून यांच्या कामगिरीवर प्रसन्न होऊन. शिरोळ या ठिकाणी देशमुखी दिली.शिरोळ भागातील विजापूर सल्तनतचा शासक इब्राहिम आदिल शाह पहिला शासकांकडून विविध मालमत्ता मिळाली. आणि घार्गे त्या ठिकाणची देशमुख पाहू लागले.        1615 याच्यानंतर हे घरानं इब्राहिम आदिलशहा दुसरा यांच्याशी कट्टर एकनिष्ठ राहिले. त्यामुळे आदिलशाही मध्ये सर्वात मोठी देशमुखी या घराण्याकडे होती. असे उल्लेख मिळतात.     अतिशय उच्च राजघराणी, सरदार घराणी, जागीरदार, मनसबदार घराण्याचे या घराण्याचे  परंपरागत सदैव संबंध होत आले