१ नोव्हेंबर १६७८छत्रपती शिवरायांनी तंजावरच्या उत्तरेकडील मुलुख जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१ नोव्हेंबर १६७६
"छत्रपती संभाजीराजे" हे त्यांच्या पत्नी "महाराणी येसूबाई साहेब" यांच्यासोबत शृंगारपुरात येऊन राहिले..

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१ नोव्हेंबर १६७८
छत्रपती शिवरायांनी तंजावरच्या उत्तरेकडील मुलुख जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१ नोव्हेंबर १६७९
मराठ्यांचा खांदेरीला पुरवठा, इंग्रजांचा त्यांचा पाठलाग आणि मराठ्यांनी त्यांना चुकवणे किंबहुना बऱ्याचदा तर इंग्रजांना पिच्छा करायला लावून आपल्या जाळात अडकवणे आणि दूर नेवून एखादा मचवा पकडणे हा मराठ्यांचा व्यवसाय अगदी व्यवस्थित सुरु होता. गनिमी काव्याचा हा सागरावरील केलेला बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा ! .इंग्रज या रोजच्याच उपद्व्यापामुळे जेरीस आले. केग्वीन या त्रासाने वैतागला आणि त्याने १ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश -
“नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही मारण्यात त्यांची शिताफी अधिक असल्यामुळे त्या आमच्या हाती लागत नाहीत. आम्ही त्रस्त आहोत. त्यांना अडविण्याच्या बाबतीत आम्ही कसलीही कसूर होऊ देत नाही याची आपण शाश्वती बाळगावी परंतु त्या लहान सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात.आता आम्हाला असे वाटू लागले आहे की आमच्या कडेही तसल्या होड्या असतील तर आम्हाला कदाचित मदत होवू ही शकेल …”
ज्या इंग्रजांना अगोदर वाटले होती की मराठ्यांच्या लहान होड्या आपण काही मोठी गलबते नेवून आरामात बुडवून टाकू तेच इंग्रज आता वरील पत्र लिहीत होते या वरून मराठ्यांचा निग्रह, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि त्यांची अनोखी युद्धनीती दिसून येते. गनिमी काव्याचा वापर करून ज्या मराठ्यांनी आजवर शत्रुसैन्याला डोंगर-दऱ्यांमधे जेरीस आणले होते त्यांनी तीच युद्धनीती सागरावर अवलंबून बलाढ्य सागरी सत्तेला जेरीस आणले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१ नोव्हेंबर १६८३
पोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक
१ नोव्हेंबर १६८३ रोजी विरजई आल्वोरने फोंड्याला मोर्चे बांधले, ३ तोफा रात्रंदिवस किल्ल्यावर आग ओकू लागल्या. दुसऱ्या बाजूने डोम रोड्रीगो द कोस्त हा हल्ला चढवत होता.
फोंडा किल्ला लढ़विण्याची जबाबदारी येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांच्यावर होती. किल्ल्यात जेमतेम ६०० मराठ्यांची शिबंदी होती तर २०० जण किल्ल्याबाहेरच्या झाडीत लपून बसले होते.
संभाजीराजेंनी फोंड्यास पोर्तुगीजांवर बाहेरून हल्ला चढवला. येसाजी कंक व कृष्णाजी कंक यांनी युद्धात मोठा पराक्रम केला. या युद्धात कृष्णाजींना वीरमरण आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१ नोव्हेंबर १६९२
पन्हाळगडाला बादशहाचा नातू "महंमद मुइनुद्दिन बेदारबख्त" याचा वेढा पडला. यावेळी गडाचे किल्लेदार होते "त्र्यंबकजी इंगळे". यांनी तब्बल ८ वर्ष किल्ला लढवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१ नोव्हेंबर १७१८
इंग्रजांचे प्रचंड ताकदीने खांदेरीवर आक्रमण.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१ नोव्हेंबर १७६०
मराठी फौजा व अहमदशाह अब्दाली याच्या फौजांची प्रथम पानिपतावर चकमक झाली. या चकमकीत अहमदशाह अब्दाली याने माघार घेऊन त्याने ०३ नोव्हेंबर १७६० रोजी दहाड येथे छावणी केली. यानंतर अब्दाली याने पुन्हा माघार घेऊन त्याने ०२ डिसेंबर  सन १७६० रोजी यमुनातीरावर छावणी केली ३० डिसेंबर सन १७६० पर्यंत अहमदशाह अब्दाली पानिपता पासून दूर यमुना तीरावर छावणी करून होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१ नोव्हेंबर १७९०
लोहगडाच्या महादरवाजाचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...