Posts

सरसेनापती खंडेराव दाभाडे (तळेगाव दाभाडे) हे मराठा साम्राज्याचे एक अत्यंत पराक्रमी आणि निष्ठावंत सेनापती होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या कालखंडात त्यांनी मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून धुरा सांभाळली आणि महाराष्ट्राबाहेर, विशेषतः गुजरातमध्ये मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार केला.

Image
सरसेनापती खंडेराव दाभाडे (तळेगाव दाभाडे) हे मराठा साम्राज्याचे एक अत्यंत पराक्रमी आणि निष्ठावंत सेनापती होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या कालखंडात त्यांनी मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून धुरा सांभाळली आणि महाराष्ट्राबाहेर, विशेषतः गुजरातमध्ये मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार केला.  पार्श्वभूमी आणि घराणे दाभाडे घराणे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील तळेगाव (दाभाडे) येथील होते. खंडेराव यांचे आजोबा बजाजी आणि वडील येसाजी दाभाडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत होते. येसाजी दाभाडे हे शिवरायांचे अंगरक्षक आणि विश्वासू सेवक होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून खंडेराव दाभाडे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात स्वराज्य सेवेत रुजू झाले.   मराठा स्वातंत्र्य संग्राम आणि कामगिरीछत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर जेव्हा मराठा साम्राज्य मोगलांशी स्वातंत्र्य लढा लढत होते, तेव्हा खंडेराव दाभाडे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.छत्रपती राजाराम महाराजांना सुरक्षितपणे जिंजीच्या किल्ल्यावर पोहोचवणे आणि तिथून परत आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.मोगलांच्...

मामा संभाजी मोहिते यांना अटक अन् वृद्ध तिमाजीस न्याय:

Image
🚩 मामा संभाजी मोहिते यांना अटक अन् वृद्ध तिमाजीस न्याय: २४ सप्टेंबर १६५६ (आश्विन वद्य प्रतिपदा, शके १५७८, दुर्मुख संवत्सर, बुधवार) आणि २८ सप्टेंबर १६५७ (आश्विन शुद्ध प्रतिपदा, शके १५७९, हेमलंबी संवत्सर, सोमवार)! 🏇⚖️ हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याच्या त्या पारदर्शक, कठोर आणि निःपक्ष न्यायव्यवस्थेचा, जिथे गुन्हेगार कितीही जवळचा नातलग असला तरी त्याला पाठीशी घातले जात नव्हते! पुणे परगण्यातील 'सुपे' ही शहाजीराजांची महत्त्वाची जहागीर होती. तिथे शहाजीराजांच्या द्वितीय पत्नी तुकाबाई यांचे सख्खे बंधू, म्हणजेच शिवरायांचे सावत्र मामा संभाजी मोहिते यांच्याकडे कारभार होता. परंतु, संभाजी मामांचा कारभार मनमानी आणि कुप्रशासनाचा होता. जहागिरीतील रयतेवर आणि वतनदारांवर त्यांचे अतोनात अत्याचार सुरू होते. 📜🏰 ⚖️ २४ सप्टेंबर १६५६: संभाजी मोहिते मामांना कैद अन् सुप्याची गढी जप्त! संभाजी मोहिते मामांच्या भ्रष्टाचाराच्या आणि अत्याचाराच्या तक्रारी जेव्हा शिवरायांच्या कानी आल्या, तेव्हा राजांनी वडील शहाजीराजांची आवश्यक ती पूर्वपरवानगी घेतली. आजच्याच दिवशी, म्हणजे २४ सप्टेंबर १६५६ रोजी शिवरायांनी अचानक...

२७ सप्टेंबर १७२९सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची पुण्यतिथी.त्यांची समाधी तळेगाव दाभाडे येथील 'श्रीमंत सरसेनापती दाभाडे श्री बनेश्वर मंदिर' येथे आहे.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ सप्टेंबर १६६५ औरंगजेबाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तहाचे फर्मान व शंभूराजेंच्या मनसबदारीचे फर्मान येऊन दाखल. मिर्झाराजांच्या हुकुमाने छत्रपती शिवाजी महाराज तळकोकणातून येऊन मिर्झाच्या छावणीत दाखल. ऐतिहासिक किल्ले पुरंदरच्या तहाची अंमलबजावणी सुरु. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ सप्टेंबर १७०७ शंकराजी नारायण पंतसचिवांचे देहावसान २७ सप्टेंबर १७०७ रोजी श्री क्षेत्र आंबवडे येथे झाले.  रामचंद्र पंतांबरोबर महाराष्ट्रात वावरणारा त्यांचा जोडीदार शंकराजी नारायण हा मावळातील शिरवळपासून वाई-सातारा पर्यंतच्या अवघड प्रदेशाचा माहितगार मोठा युक्तिबाज व हर तऱ्हेने कार्य सिद्धीस नेणारा होता. मावळातील लोकात त्याचे चांगले वजन होते. औरंगजेबाने मावळातील किल्ले घेण्याचा सपाटा लावताच शंकराजीने मावळी फौज उभी करून ते बादशहाच्या कब्जातून परत घेतले. तो अत्यंत धाडसी व उलाढाल्या करण्यात तरबेज होता. हाती घेतलेल्या कमी सबब सांगत तो कधी आला नाही. रामचंद्रपंतांवर त्याची पूर्ण निष्ठा होती. मावळातील किल्ले लगोलग घेण्यात त्याने चांगलीच हुशारी दाखवली. वतने परत दिल...

२६ सप्टेंबर १६७३छत्रपती शिवरायांनी श्यामजी नाईक यांना सिद्दी मसूदशी बोलणी करण्यासाठी पाठवले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ सप्टेंबर १६७३ छत्रपती शिवरायांनी श्यामजी नाईक यांना सिद्दी मसूदशी बोलणी करण्यासाठी पाठवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २६ सप्टेंबर १६७७ छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमे वेळी जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला व त्याच्या बंदोबस्तासाठी पुष्कळ पायदळ व घोडदळ ठेवून दिले. त्यांनी १४ मोठे किल्ले व ७२ मजबूत टेकडया काबीज केल्या. कर्नाटकातील बहुतेक सधन लोकांकडून अपार द्रव्य घेतले. महाराजांनी कर्नाटकांत जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी व जिंकलेल्या प्रांतांचा बंदोबस्त रघुनाथ नारायण हणमंते यांनी केली म्हणून छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांस २६ सप्टेंबर १६७७ या दसऱ्याच्या मुहूर्तावर दख्खनची मजमू व जिंजी प्रांताचा सरसुभा असे महत्त्वाचे अधिकार सोपविले. हणमंते यांनी कर्नाटक प्रांताचा बंदोबस्त चांगला ठेवून त्यांत आणखी भर घातली. पण छत्रपती श्री संभाजी महाराजांविरुद्ध जे कट रायगढला शिजले त्यांत हणमंते यांचे अंग आहे असे छत्रपती संभाजी महाराजांस कळून आले तेव्हा त्यांस कैद कर...

६ सप्टेंबर १६८२छत्रपती संभाजीराजे "संगमनेर" मध्ये दाखल

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ६ सप्टेंबर १६७५ छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी इंग्रज अधिकारी "सॅम्युअल आॅस्टीन" किल्ले रायगडवर हजर. राज्याभिषेक समारंभ आटोपताच डिसेंबर १६७४ मध्ये औरंगाबाद परिसरात आले आणि मुघली मुलखात लूट करण्याबरोबरच त्यांनी इंग्रजांच्या डूमगावच्या वखारीवर हल्ला केला आणि ती लुटून १० हजारांची लूट मिळवली. मुघल आणि आदिलशाही मुलखातील आपल्या वखारी सुरक्षित नसल्याचे लक्षात आल्याने इंग्रजानी सॅम्युअल ऑस्टिन याला आपल्या वखारीना कौल मागण्यासाठी शिवाजी महाराजांच्याकडे पाठवायचे ठरवले. याप्रमाणे महाराजांसाठी ५०० रुपयांचा नजराणा घेऊन ऑस्टिन आपला सहकारी रॉबर्ट हार्बीनसह रायगडाकडे निघाला. या भेटीत त्याने महाराजाना भेट देण्यासाठी लहान पितळी तोफ, मोरोपांत व आण्णाजीपंत यांच्यासाठी स्कारलेट कापड, १ आरसा, १ तोळा कस्तुरी, चिटणीस व सेनापती ना देण्यासाठी ३ यार्ड कापड व इतर भेटवस्तू सोबत घेतल्या. ऑस्टिन २ सप्टेंबरला निजामपूर येथे पोहोचला. तिथे त्याची भेट मोरोपंत व अण्णाजीपंतांशी झाली. पण ते पुढे जुन्नरला जाणार असल्याने त्यांच्याकडून महाराजांसाठी पत...

४ सप्टेंबर १६५६४ सप्टेंबर १६५६ या दिवशी शिवाजीराजांनी त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांचे नवीन नामकरण केल्याची नोंद आहे. याचवेळी रायरीचे रायगड, तोरण्याचे प्रचंडगड, रोहिड्याचे विचित्रगड व चाकणच्या भुईकोट किल्ल्याचे संग्रामदुर्ग असे नाव ठेवण्यात आले असावे.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ सप्टेंबर १४६१ ४ सप्टेंबर १४६१ रोजी हुमायूनचा खून झाला. क्रूरकर्मा म्हणून त्याची इतिहासात ख्याती आहे. त्यानंतर त्याचा अल्पवयीन मुलगा निजामुद्दीन (कार. ४ सप्टेंबर १४६१-३० जुलै १४६३) गादीवर आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ सप्टेंबर १६५६ ४ सप्टेंबर १६५६ या दिवशी शिवाजीराजांनी त्यांच्या ताब्यातील किल्ल्यांचे नवीन नामकरण केल्याची नोंद आहे. याचवेळी रायरीचे रायगड, तोरण्याचे प्रचंडगड, रोहिड्याचे विचित्रगड व चाकणच्या भुईकोट किल्ल्याचे संग्रामदुर्ग असे नाव ठेवण्यात आले असावे. तसेच काही महिन्यांपूर्वी जावळीतील भोरप्याच्या डोंगरावर किल्ल्याचे बांधकाम चालु झाले होते त्याला महाराजांनी नाव दिले प्रतापगड!  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ सप्टेंबर १६६० महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातुन निसटुन विशाळगडावर आले (जुलै १६६०), त्याच सुमारास किंवा लवकरच कान्होजींची प्रकृती ढासळत होती. दुर्दैवाने त्याच सुमारास कान्होजींच्या सहा मुलांमधे वाटणीवरून वाद सुरू होते. शिवाजीराजांना कान्होजींच्या आजारपणाची बातमी कळताच त्यांना एक मोठे पत्र लिहिले. त्यात ते कान्होजींना औषध व उपचार ...

३ सप्टेंबर इ.स.१६७५*महाराजांनी रामनगर पेठ वसविली! छत्रपती शिवाजी महाराजांनी पारमाची तर्फ शिवथर येथे रामनगर पेठ वसविली. राज्याभिषेका नंतर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहिम उघडली. महाडच्या उत्तरेस १५ कि.मि. अंतरावर असलेल्या पारमाची तर्फ शिवथर या खोऱ्यातील गावात महाराजांनी रामनगर पेठ वसविली.

*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* *३ सप्टेंबर इ.स.१६७५* महाराजांनी रामनगर पेठ वसविली!            छत्रपती शिवाजी महाराजांनी पारमाची तर्फ शिवथर येथे रामनगर पेठ वसविली. राज्याभिषेका नंतर महाराजांनी इंग्रजांविरुद्ध मोहिम उघडली. महाडच्या उत्तरेस १५ कि.मि. अंतरावर असलेल्या पारमाची तर्फ शिवथर या खोऱ्यातील गावात महाराजांनी रामनगर पेठ वसविली. *३ सप्टेंबर इ.स.१६७९* खांदेरी किल्ल्याचे बांधकाम रोखण्यासाठी ह्युजेसच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमार मुंबईहुन रवाना झाले होते. जंजिरेकर सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांची स्वेच्छेने नसली तरी नाईलाजास्तव मैत्री होती [कारण सिद्दीला मदत करून इंग्रज मुघलांकडून कोकणातील बराचसा महसूल माफ करून घेत असत.मुघलांचे स्वतंत्र असे आरमार अगदी कमकुवत असावे अथवा नगण्य होते कारण सिद्दीला त्याच्या आरमाराकरिता मुघलांनी आपले मांडलिक केले होते]. या मैत्रीच्या आधारे सिद्दीचे आरमार दर पावसाळ्यात मुंबईला माजगावच्या बंदरात नांगरले जात असे.याचे कारण असे की पावसाळ्यात दर्याला उधाण असते व भर समुद्रात जंजिऱ्या जवळ आरमार ठेवणे मोठे मुश्कील. तसेच जंजिऱ्याचा आसपासच...