Posts

Showing posts from January, 2021

मौजे लासुरणे तालुका इंदापुर वाघमोडे पाटील घराण्याचा ताम्रपट

Image
मौजे लासुरणे तालुका इंदापुर वाघमोडे पाटील घराण्याचा ताम्रपट

मंचर येथील पांडवकालीन बारव मधिल शिलालेख 🚩🚩🚩🚩🚩🚩

Image

राजाचे कुर्ले येथील 800वर्षा पूर्वीचा शिलालेख

Image
राजाचे कुर्ले  येथील राजे भोसले या राजवंशाची गढी. परंपरेने अक्कलकोट घराण्यात या वंशातील दत्तक घेतला जातो.  मोठ्या शिळांनी बनलेला, मातीचे मोठे भेंड वापरून केलेली तटबंदी असणारी भुईकोट किल्ला वाटावी अशी गढी बहामनी काळातील स्थापत्याच्या खुणा दाखवते.  याच गावातील श्री धाकुबाई मंदीरपरिसरात एक शीलालेखही आहे. सातारचे जिज्ञासा इतिहास संशोधन मंडळ गेल्या दोन दशकांपासून सातारा इतिहासाप्रती जनजागृतीचे कार्य करीत आहे . संस्थेच्या वतीने आजपर्यंत सातारा परीसरातील अनेक ऐतिहासीक वस्तू ,वास्तू , शिला लेखावर प्रकाशात आणून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत . साधारण एक वर्षापूर्वी  सातारच्या प्राचीन इतिहासाच्या संकलनासाठी जिज्ञासाने  केलेल्या सर्वक्षणात संस्थेचे प्राचीन लिपी अभ्यासक धैर्यशील पवार यांना हा शिलालेख अढळला . कराडपासून 26 किलोमिटर आणि सातारपासून 34 किलोमीटरवर अंतरावर गिरीजा शंकराच्या पायथ्याला वसलेले राजाच कुर्ले नावाच  गाव आहे . या गावाच्या रचनेवरूनच ऐतिहासीक महत्व लक्षात येते .गावात इतिहास काळातील एक प्राचीन गढी आहे . ग्रामदैवत असणारे धाकूबाईच मंदिर , महादेव मंदिर , मारुती मं

उद्योग रत्न रतनजी टाटा यांना मनाचा मुजरा

Image
🙏 श्री.रतनजी टाटा यांना मानाचा मुजरा 🙏   काल कोथरूड इथे आपल्या आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी चक्क आदरणीय #रतन_टाटा सर स्वतः भेटायला आले होते. कितीही मोठं आणि यशस्वी झाला तरी आपल्या भूतकाळात ज्यांनी साथ दिली त्यांना कधीच विसरू नये हाच बोध रतन टाटा यांनी आपल्या सर्वांना दिला.  यावरून माणसाची आपल्या मातीशी असलेली नाळ किती जोडली गेली आहे ते दिसून येते. फक्त पैसा असून उपयोग नाही, माणूसकी असायला हवी. खरच या साधेपणामुळे आपल्या बद्दल आदर आणखी वाढला सर. खरच तुम्हाला वंदन करावस वाटत सर.🙏 #ratantata

कागल हाऊस या नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू

Image
जवळपास एक शतकाहून अधिक वर्षापूर्वी बांधलेली आणि त्या काळात कागल हाऊस या नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरातील ऐतिहासिक अशी व सर्व सोयीनियुक्त इमारत  स्व. बापूसाहेब घाटगे महाराज यांनी त्यावेळी शासनास (जिल्हा परिषदेसाठी) दिली. इ.स. 1910 साली बापूसाहेब महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बांधलेल्या या वास्तूचे आता नूतनीकरण करण्यात येणार आहे. ही बातमी आम्हाला आजच समजली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याशी या इमारतीचे नाते ऋणानुबंधाचे आहे.  विशेष म्हणजे आज बापूसाहेब महाराज यांची जयंती आणि याच बापूसाहेब महाराजांनी बांधलेल्या या सुंदर अशा वास्तूचे जिल्हापरिषदेमार्फत नूतनीकरण करण्यात येणार असल्याची बातमी आजच समजावी, हा एक सुंदर असा योगायोगच!.

स्वराज्याचे शिलेदार सुर्यराव ​काकडे

Image
सुर्यराव ​काकडे  सुर्यराव हे,छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते. अशा अनेक नोंदी आहेत. रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिवाजी महाराजानी ‘सुरराव काकडे दोन हजार हासम जावळीवर रवाना केले.’असा मोर्‍याच्या बखरीमध्ये उल्लेख आहेत. सुर्यराव यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला. त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली.ते एकून पातशहा कष्टी झाला,नि म्हणाला,’ काय इलाज करावा,लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले.आता कोण पाठवावे ‘तेव्हा पातशहाने ‘शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले. मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला.हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले.’हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून ये

छत्रपती संभाजी महाराज "मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातील सुवर्ण पर्व .

Image
"छत्रपती संभाजी महाराज " मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातील सुवर्ण पर्व . जगाच्या पाठीवर आजपर्यंत राजे , शासक अनेक झाले , आहेत आणि होतील , पण छत्रपती संभाजी महाराज , हे जो पर्यंत चंद्र - सूर्य आहेत , तो पर्यंत सर्वोत्तम राजे म्हणोन राहतील . मात्र ११ , ५६८ दिवसांचे आयुष्य , परंतु शंभूराजे त्यातही जीवन जगण काय असतं हे शिकवून गेलं , ते उत्तम कवी होते , उत्तम प्रशिक्षक होते , उत्तम अभियंता होते , उत्तम वैज्ञानिक होते , उत्तम जलतज्ञ होते , उत्तम वनस्पतीशास्त्राचे जाणकार होते , उत्तम सेनापती होते , उत्तम शासक होते . छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर , लवकरच आलमगीर ३ लाख घोडदळ , २ लाख पायदळ , १ लाख सेवकवर्ग , ३ हजार हत्ती , ५० हजार उंट , प्रचंड तोफखाना  ७० लांब पल्ल्याच्या तोफा होत्या , १५ कोटीचा खजिना , अमीर उमराव व मनसबदार यांची संख्या साडे ३ हजार होती , शहजादा मुअज्जम , आज्जम , कामबक्ष , नातू मूईद्दीन , बेदारबखत , नामांकित सरदार असदखान [ वजीर ] , एतियार खान , शहाबुद्दीन खान , फत्तेखान , रुहुलाखान , हसनअलीखान , दाऊदखान , तरबियतखान अशा सेनानींचा ताफा होता ; परंतु औरंगजेब