राजाचे कुर्ले येथील 800वर्षा पूर्वीचा शिलालेख

राजाचे कुर्ले 
येथील राजे भोसले या राजवंशाची गढी.
परंपरेने अक्कलकोट घराण्यात या वंशातील दत्तक घेतला जातो. 
मोठ्या शिळांनी बनलेला, मातीचे मोठे भेंड वापरून केलेली तटबंदी असणारी भुईकोट किल्ला वाटावी अशी गढी बहामनी काळातील स्थापत्याच्या खुणा दाखवते. 
याच गावातील श्री धाकुबाई मंदीरपरिसरात एक शीलालेखही आहे.
सातारचे जिज्ञासा इतिहास संशोधन मंडळ गेल्या दोन दशकांपासून सातारा इतिहासाप्रती जनजागृतीचे कार्य करीत आहे . संस्थेच्या वतीने आजपर्यंत सातारा परीसरातील अनेक ऐतिहासीक वस्तू ,वास्तू , शिला लेखावर प्रकाशात आणून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत . साधारण एक वर्षापूर्वी 
सातारच्या प्राचीन इतिहासाच्या संकलनासाठी जिज्ञासाने  केलेल्या सर्वक्षणात संस्थेचे प्राचीन लिपी अभ्यासक धैर्यशील पवार यांना हा शिलालेख अढळला .
कराडपासून 26 किलोमिटर आणि सातारपासून 34 किलोमीटरवर अंतरावर गिरीजा शंकराच्या पायथ्याला वसलेले राजाच कुर्ले नावाच  गाव आहे . या गावाच्या रचनेवरूनच ऐतिहासीक महत्व लक्षात येते .गावात इतिहास काळातील एक प्राचीन गढी आहे . ग्रामदैवत असणारे धाकूबाईच मंदिर , महादेव मंदिर , मारुती मंदिर अशी इतर मंदिरे आहेत. धाकूबाई मंदिराचे बांधकाम फारसे प्राचीन नाही परंतू मंदिराजवळच प्राचीन जीर्ण स्थितीतील गजलक्ष्मी शिल्प , काही वीरगळी आणि भग्न शिल्पे या परिसराच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात . याच मंदिर आवारात सदरचा शिलालेख भिंतीत बसवलेला आहे . शिलालेख खूपच जीर्ण झालेला असून कालौघात शिला लेखावर सिमेंट वाळूचा थर बसल्याने शिलालेखाचा बराचसा भाग अनाकलनीय झाला आहे. जिज्ञासाच्या सदस्यानी गेल्या काळात वेळोवेळी भेट देऊन खुप मेहनतीने शिला लेख स्वच्छ केला . वेगवेग़ळी तंत्रे वापरून त्याचे ठसे घेतले त्याच बरोबर आधुनीक फोटोग्राफी तंत्राचा वापरही केला . शिलालेखाची लिपी देवनागरी आहे . परंतू तिचे अक्षर वळण जवळपास हजार वर्षे जुने असल्याने तसेच अक्षरे खूपच खराब झाल्याने शिलालेखाचे वाचन करण्यासाठी परीश्रम घ्यावे लागत आहेत .

काय आहे शिलालेख ……
या शिला लेखाची सुरुवातीस
सवत्स धेनू  शिल्प कोरल आहे .
सरदचे शिल्प भू दानाचे निदर्शक मानले जाते .त्या वरती सदरचे दान चंद्र-सुर्य असे पर्यंत अबाधीत राहील या आशयाने चंद्र सुर्याचे चित्रांकन केले आहे .त्या पुढे शिवलींग कोरले आले .लेखाची सुरवात शके 1085 सुभानु नाम संवत्सर यांनी झाली आहे. सुवर्ण वृषभ ध्वज , समस्त भुवन आश्रय, श्री पृथ्वी वल्लभ, कालांजरपुरवराधिश्वर या पदव्यांनी वर्णन केलेला कलचुरी चक्रवर्ती भुजबलमल्ल देव म्हणजेच बिज्जलदेव द्वितीय याचा मांडलिक, महामंडलेश्वर, पंचमहाशब्द प्राप्त , विष्णू वंशोद्भव, जादव नारायण, जादवकुलकमल, विकसित भास्कर या पदव्यांनी गौरविलेला जेसिंघदेव याने हे भूमिदान चंद्रग्रहणाच्या दिवशी दिलेले आहे .

 सदरच्या शिलालेखामूळे सातारच्या प्राचीन इतिहास उलगडण्यास मोठी मदत होणार आहे.

प्राचीन शिलालेखामुळे उलगडणार साताऱ्याचा सुवर्णकाळ......

साधारण एक हजार वर्षांपूर्वी दक्षिण महाराष्ट्रामध्ये चालुक्यांचे राज्य होते यांना पश्चिमी चालुक्य म्हणूनही ओळखले जाते. कल्याण किंवा बसवकल्याण या गावावरून त्यांना कल्याणी चालुक्य म्हणून ओळखले जाते. पश्चिम समुद्रावरून होणाऱ्या अत्यंत फायदेशीर अशा या व्यापारातून प्रचंड संपत्ती प्राप्त केलेला हा प्राचीन राजवंश . त्यांच्या राज्यात शिलाहार , सिंद , गंग , नल , यादव, कलचुरी असे एकाहून महामंडलेश्वर सामंत चक्रवर्ती चालुक्यांचे मांडलिक होते.
त्यापैकीच कलचुरी हे घराणे. कालंजर मध्यप्रदेशातल्या शहरातील हे घराणे मध्यंतरी दोनशे तीनशे वर्ष आपल्या मूळ राज्या दक्षिणेत उमेदवारी करणाऱ्या त्यांच्या एका वंशजाने तरदवाडी या गावात आपल्या सामंतशाहीची सुरुवात केली. एकाहून एक अशा शूर राज पुरुषांनी या कुळाची शोभा वाढवली होती. चालुक्य राजा तैल तृतीय राजाच्या अत्यंत विश्वासातले हे घराणे. बिज्जल देव द्वितीय या महत्त्वाकांक्षी राज पुरुषाने कमी वयाचा दुर्बल राजा गादीवर येताच राजधानी बंड करून अत्यंत हुशारीने स्वतःला चक्रवर्ती जाहीर केले. त्याच काळातील समाजसुधारक संत बसवेश्वरांनी नवीन पंथाची स्थापना केली . 
अशा धामधुमीच्या काळातील आठशे साडे आठशे वर्षे जुना एक शिलालेख  कराड चार हजार या प्रांतातील राजाचे कुरले या गावी अढळला आहे .

 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४