छत्रपती संभाजी महाराज "मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातील सुवर्ण पर्व .

"छत्रपती संभाजी महाराज "
मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासातील सुवर्ण पर्व . जगाच्या पाठीवर आजपर्यंत राजे , शासक अनेक झाले , आहेत आणि होतील , पण छत्रपती संभाजी महाराज , हे जो पर्यंत चंद्र - सूर्य आहेत , तो पर्यंत सर्वोत्तम राजे म्हणोन राहतील .

मात्र ११ , ५६८ दिवसांचे आयुष्य , परंतु शंभूराजे त्यातही जीवन जगण काय असतं हे शिकवून गेलं , ते उत्तम कवी होते , उत्तम प्रशिक्षक होते , उत्तम अभियंता होते , उत्तम वैज्ञानिक होते , उत्तम जलतज्ञ होते , उत्तम वनस्पतीशास्त्राचे जाणकार होते , उत्तम सेनापती होते , उत्तम शासक होते . छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर , लवकरच आलमगीर ३ लाख घोडदळ , २ लाख पायदळ , १ लाख सेवकवर्ग , ३ हजार हत्ती , ५० हजार उंट , प्रचंड तोफखाना  ७० लांब पल्ल्याच्या तोफा होत्या , १५ कोटीचा खजिना , अमीर उमराव व मनसबदार यांची संख्या साडे ३ हजार होती , शहजादा मुअज्जम , आज्जम , कामबक्ष , नातू मूईद्दीन , बेदारबखत , नामांकित सरदार असदखान [ वजीर ] , एतियार खान , शहाबुद्दीन खान , फत्तेखान , रुहुलाखान , हसनअलीखान , दाऊदखान , तरबियतखान अशा सेनानींचा ताफा होता ; परंतु औरंगजेबाचे पारिपत्य करण्याकरिता , संभाजीराजे समर्थ होते , तो येण्यापूर्वीच बुऱ्हाणपूर लुटून आणि शहजादा अकबर यास पन्हा देऊन , त्यांनी औरंगजेबास हिनवले होते . ६ महिन्यात संपूर्ण दख्खन जिंकून घेतो , असा म्हणणाऱ्या औरंगजेबाला , शंभराजांनी पूर्णतः हतबल केले , सन १६८५ नंतर त्याने स्वराज्याविरुध्द मोहीम रद्द करून , त्याने त्याचा मोर्चा आदिलशाही आणि कुतुबशाहीकडे वळविला , एवढंच काय तर शंभूराजांच्या पराक्रमामुळे , त्याने त्याचा शाही किमौंश खाली ठेवला आणि कसम घेतली , की जोपर्यंत संभाला कैद करत नाही वा ठार मारत नाही तोपर्यंत शाही किमौंश परिधान करणार नाही

सन १६८१ मध्ये औरंगजेब काही एकटा स्वराज्यविरुद्ध चालून नव्हता आला , त्याने सिद्दी , पोर्तुगीज , व टोपीकर इंग्रज यांना स्वराज्याच्या कुरापती काढण्यास चेतविल होतं , एकाच वेळी , उत्तम योजनाबद्ध नियोजनामुळे , शंभूराजांनी सर्वच आघाड्यांवर विजयश्री कायम बरोबर ठेवला .

 छत्रपती संभाजी महाराजांनी वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती सुद्धा साधली होती , मात्र प्रबळ बुद्धीच्या बळावर . राजांनी युद्धभूमीवरील गरज ओळखून , जगातील पहिल्या बुलेटप्रूफ जॅकेटची निर्मिती केली होती , तसेच जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार केला , जझिरे - मेहरुब [ जंजिरा ] जिंकण्याकरिता महाकाय समुद्रात ८०० मीटर लांबीचा सेतू बांधला होता , आधुनिक शस्त्रांची निर्मिती सुद्धा राजे करत होते , स्वराज्याचे दारूगोळ्याचे कारखाने सुद्धा उभारले होते . हिंदवी स्वराज्याचे आरमार सुसज्ज करण्याकरिता परदेशातून तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य सुद्धा घेतले होते . छत्रपती संभाजीराजे , आदिलशाही आणि कुतूबशाहीचे पित्याप्रमाणे सांभाळ करत होते [ एका पोर्तुगीज अधिकारी याने लिहून ठेवले होते ] , तर राजे मोगलांचे कर्दनकाळ ठरले होते , आणि सिद्दी , पोर्तुगीज , टोपीकर इंग्रज यांना शक्तीच्या व प्रगल्भ बुद्धीच्या बळावर थोपवून ठेविले होते . छत्रपती संभाजी महाराजांनी प्रतिकूल काळातही , स्वराज्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न ठेविले होते . जगतगुरु महान संतश्रेष्ठ तुकोबांच्या ,  देहू ते पंढरपूर आषाढी वारीला संरक्षण आणि अर्थसाहाय्य दिले होते .
 एकंदर संपूर्ण भारत राष्ट्राचा , इतिहास अभ्यासला तर निष्कर्ष असा निघतो , महान व्यक्ती ही शास्त्रात किंवा शस्त्रात पारंगत असते , पण ह्या तत्वाला अपवाद ठरतात , मात्र  छत्रपती संभाजी महाराज ,त्यांनी जे महान ग्रंथ लिहले आहेत [ बुधभूषण , नायिकाभेद , सातशातक , व नखशिखान्त ] , त्या ग्रंथ अभ्यासल्यावर विश्वातील रहस्यांचा उलगडा होता , तर त्यांची रणांगणातील युद्धे अभ्यासली तर त्यांच्या पराक्रमाबद्दल स्तुती करण्यासाठी शब्द सुचतच नाहीत , ही व्यथा आहे , खुद्द औरंगजेब सुद्धा म्हणोन गेला की ,  संभाजीला रणांगणात हरवणे नामुमकीन आहे.अशी छत्रपती शंभूराजांची युद्धनीती ,पराक्रम होता.

#छत्रपती_शिवाजी_महाराज 
#छत्रपती_संभाजी_महाराज 
#दैवत_छत्रपती_शिवशंभू ⛳⛳⛳

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...