भूषणगड हा खटाव तालुक्यातील निमसोड गावाजवळ एका उंच डोंगरावर आहे.
भूषणगड हा खटाव तालुक्यातील निमसोड गावाजवळ एका उंच डोंगरावर आहे. अत्यंत सुंदर किल्ला असून हा तेराव्या शतकात यादव राजा सिंघण याने बांधला आहे. पुढे तो बहामनी राजवटीकडे आणि नंतर आदिलशहाकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. मराठ्यांच्या इतिहासात या किल्ल्याचे महत्वचे स्थान आहे. औरंगजेबाने हा किल्ला १७०० साली बळकावला पुढे तो मराठ्यांनी जिंकून घेतला. कोट्यावधी खजिना आणि लाखोंची फौज घेऊन सतत २७ वर्षे मराठ्यांविरुद्ध लढणाऱ्या औरंगजेबाला मराठ्यांनी महाराष्ट्राच्या मातीतच गाडले, त्यामध्ये भूषणगड माण खटावच्या रणभूमीने मोलाचे योगदान दिलेले आहे .