२ ऑगस्टला सन १६४८ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळ जिंकून स्वराज्यात जोडले.
आदिलशाहीचा वजीर मुस्तफाखानाने 25 जुलै इसवी सन १६४८ साली दगा फटक्याने शहाजीराजांना बेसावध वेळेला गाठून कैद केले. त्याचबरोबर आदिलशाहीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात पारिपत्य करण्यासाठी सरदार फत्तेखानाला पाठवला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पुरंदर वर होते. साहजिकच पुरंदरच्या आसपास लढाई होणार. शिरवळ परिसर स्वराज्य विस्तारासाठी सुरुवातीच्या मोहिमां पैकी महत्त्वाचे यश होत. ज्यावेळेस सरदार फत्तेखान छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती स्वारीस रवाना झाला त्यावेळेस त्याच्यासोबत रतन शेख , मिलिंद शेख, बाळाजी हैबतराव, फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर, मताजी घाटगे असे आदिलशाहीतील मातब्बर सरदार होते. आदीलशाहाने केदारजी खोपडे यास ८ ऑगस्ट १६४८ रोजी फत्तेखानास मदत करण्यासाठी पत्र पाठवले होते.ते उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत कावजी मल्हारी, भीमाजी वाघ, गोदाजीराजे जगताप, संभाजीराव काटे, शिवाजीराव इंगळे, भिकाजी चोर, भैरव चोर, बाजी पासलकर अशी नावे कवी परमानंद शिवभारत ग्रंथ मधून मिळतात. आदिलशहाच्या अज्ञानुसार मोहिमेच नेतृत्व करणाऱ्या फत्तेखान व व तत्का...